Home /News /maharashtra /

कोरोनाच्या संकटात वरिष्ठांनीच केलं स्टिंग ऑपरेशन, पोलीस कर्मचारी परीक्षेत झाले पास

कोरोनाच्या संकटात वरिष्ठांनीच केलं स्टिंग ऑपरेशन, पोलीस कर्मचारी परीक्षेत झाले पास

लॉकडाऊनमध्ये अनेक जिल्ह्यात सीमाबंदी आहे. त्यामुळे बाहेरून विनापरवाना येणाऱ्या वाहनांनाही जिल्ह्यात प्रवेश दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी आणि आरोप केले जात आहेत.

    उस्मानाबाद, 20 मे : कोरोनाने देशात धुमाकूळ घातला असून त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये सीमाबंदी करण्यात आली आहे. सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून हॉटस्पॉटमधून विनापरवाना आलेल्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी अशी वाहने चिरीमिरी देऊन सोडली जात असल्याचेही आरोप होत आहेत. कोरोनाचा धोका ओळखून उस्मानाबादच्या पोलीस अधिक्षकांनी चेकपोस्टवर स्टिंग ऑपरेशन करत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली. त्यांनी डमी प्रवासी वाहन पाठवले. त्या वाहनातील व्यक्तीनं पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बळी न पडता कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहनधारकास पुढे जाण्यास परवानगी दिली नाही. चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांचा हा प्रामाणिकपणा पाहून पोलीस अधीकांनी दोन्ही पोलिसांना बक्षीस दिलं तसंच मंदिर सुरक्षा रक्षकांना प्रशंसापत्र देऊन गौरव केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी चेकपोस्ट असून इथून हॉटस्पॉट असलेल्या भागातील वाहने जिल्ह्यात येत असल्याच्या तक्रारी आणि आरोप केले जात होते. हे वाचा :  सॅल्युट! नाशिकच्या पोलिसाने असं काम केलं की खुद्द गृहमंत्र्यांनी केलं खास कौतुक पोलिसांवर होणाऱ्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी एक डमी वाहन पाठवून चेक पोस्टवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, योगेश कांबळे यांनी वाहनधारकाला सोडण्यास मनाई केली. त्यांनी कोणत्याच प्रलोभनाचा स्वीकार केला नाही. पोलिसांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे. हे वाचा : कोरोना रुग्णाच्या मृतदेहात किती वेळ राहतो व्हायरस? ICMRने दिली महत्त्वाची माहिती
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या