कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे बस्तान, आढळले 6 नवे रुग्ण!

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे बस्तान, आढळले 6 नवे रुग्ण!

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे

  • Share this:

डोंबिवली, 06 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईतही सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. तर मुंबई नजीकच्या परिसरातही रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 6 नवे रुग्ण आढळून आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. आज आणखी नव्या 6 रुग्णांची भर पडली आहे. डोंबिवलीमध्ये 4 रुग्ण आढळले आहे तर कल्याण परिसरात 2 रुग्ण आढळले आहे.

हेही वाचा -6 वर्षांच्या मुलानं मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात

कोरोनाबाधित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालय, मुंबई इथं उपचार सुरू आहे.  कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेचे 154 आरोग्य पथकामार्फत 14 दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व  रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा - 'ना कपडे राहिले ना चप्पल, बाळाचं दूध पण बंद झालं' मनाला सुन्न करणारा VIDEO

यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्‍णसंख्‍या आतापर्यत 34 वर पोहोचली आहे. त्‍यापैकी डोंबिवली येथील लग्‍न सोहळयाशी संबंधित एका रुग्‍णाला कस्‍तुरबा रुग्‍णालयातून पुर्नतपासणी अंती डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्‍या रुग्‍णांची संख्‍या सहा झाली आहे. यात 4  कल्‍याण आणि 2 डोंबिवलीमधील रुग्णांचा समावेश आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता  सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा, महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे तसंच  अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मिणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251- 2310700 व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

First published: April 6, 2020, 1:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या