राज ठाकरेंचा तबलिगींना खळ्ळ-खट्याकचा इशारा, मुस्लीम मंडळाने व्यक्त केली भीती, म्हणाले...

राज ठाकरेंचा तबलिगींना खळ्ळ-खट्याकचा इशारा, मुस्लीम मंडळाने व्यक्त केली भीती, म्हणाले...

. या पत्रात तबलिगी जमातीने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही केली आहे.

  • Share this:

पुणे, 06 एप्रिल : दिल्लीतील निजामुद्दीन इथं झालेल्या तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेली लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने आक्षेप घेतला असून समाजाची माफी मागण्याची मागणी केली आहे. तसंच,  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तबलिगी जमातीतील लोकांना गोळ्या झाडण्याची भाषा केली होती. त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या पत्रात तबलिगी जमातीने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

राज ठाकरेंच्या विधानामुळे भीतीचे वातावरण

'मरकजच्या घटनेतील लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे,' अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.तसंच राज ठाकरे यांनी " तबलिगीला कसली ट्रिटमेंट देताय, त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे." असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा घबराट निर्माण झाली आहे,अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे बस्तान, आढळले 6 नवे रुग्ण!

 'तबलिगी जमातीने तोबानामा जाहीर करावा'

निजामुद्दीन, दिल्ली येथील मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तबलिगी जमातचा बेजबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे.

हेही वाचा - कोरोना राहिला बाजूला, भावानेच घेतला बहिणीचा जीव; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

तबलिगीच्या असंवेदनशील  वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे या जमातीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यामुळे दिलासा

तबलिगीच्या वर्तनाचा समाचार घेत भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत होता. त्यामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसंच  पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असंही या पत्रात म्हटलं आहे.

'रमजान घराच्या चार भिंतीतच साजरी करा'

 

येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोकं मस्जिद मध्ये नमाज आदा करतात आणि कबरस्थानात जावून प्रार्थना करीत असतात. पंधरा दिवसांवर रमजान महिना सुरू होत आहे. मुस्लीम समाजात रमजानला फार महत्व असते. महिनाभर उपास, नमाज, कुरान पठण केले जाते. ईदगाहवर जावून सामुदायिक नमाज अदा करणे, आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट - अलिंगन दिले जाते. हे सर्व  कोरोना विषाणू पसरवण्यात आणि कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. मानवतेसमोरील ह्या  संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा  आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादीत ठेवावे. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे, असं आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून करण्यात आलं आहे.

First published: April 6, 2020, 2:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या