LockDown मध्ये उरकलं लग्न, सोशल डिस्टन्सिंग पाळत नातेवाईकांनी वधुवरांना 'असे' दिले आशीर्वाद

लॉकडाउनचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सिंग पाळत महाराष्ट्रात विवाह सोहळा पार पडला.

लॉकडाउनचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सिंग पाळत महाराष्ट्रात विवाह सोहळा पार पडला.

  • Share this:
    चंद्रपूर, 08 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी कोणतेच औषध नाही. त्यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एक उपाय आहे. म्हणून भारतात लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सिंग पाळत महाराष्ट्रात विवाह सोहळा पार पडला. ब्रह्मपुरी इथे हा विवाह सोहळा झाला असून नातेवाइकांनी व्हिडिओ कॉलद्वारे विवाहित दाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. ब्रह्मपुरी इथल्या नरेंद्र म्हस्के यांचा मुलगा विशालचे लग्न नागझरीतल्या लक्ष्मी हिच्याशी ठरले होते. मात्र लॉकडउनमुळे लग्न कसे होणार याचा प्रश्न होता. मात्र लग्नातील इतर कार्यक्रम रद्द करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय़ दोन्ही कुटुंबियांनी घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह उरकण्यात आला. विवाहाच्या विधीवेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं. लग्नानंतर सर्व नातेवाईकांनी वधुवरांना व्हिडिओ कॉल करून आशीर्वाद दिले. हे वाचा : जालन्यातील 'त्या' रिपोर्टमुळे 3 दवाखान्यांसह 1 हजार 500 लोकांना दिलासा याआधीही महाराष्ट्रातील औरंगाबाद इथं मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत निकाह पार पडला होता. तेव्हा नवरीच्या कुटुंबियांनी व्हिडिओ कॉलवरून लग्नाला उपस्थिती लावली होती. सर्व विधीही त्यांनी व्हिडिओ कॉलवरून केले होते. लॉकडाउनमुळे देशात बाहेर फिरण्यास तसंच गर्दी करण्यास बंदी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला असून तो 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता यामध्ये वाढही होण्याची शक्यता आहे. हे वाचा : 5 मिनिटं उभं राहून मोदींना मानवंदना देण्यावर पंतप्रधानांनी स्वतः केला खुलासा संपादन - सुरज यादव
    First published: