मुंबई, 23 मार्च : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढून आता 427वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 89 रुग्ण आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रासह 22 राज्य आणि 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे निर्देश आता केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. तर सरकारच्या नियमांचं उल्लंघन कऱणाऱ्यांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरसचा हा संसर्ग लक्षात घेता या विरुद्धचा लढा गंभीरपणे घ्यायला हवा. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलं आहे. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका सरकारने दिलेल्या आदेश आणि नियमांचा उल्लंघन करू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
लोकल, ट्रेन, मेट्रो, शाळा, कॉलेज, मैदान सर्व बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आज कोरोनामुळे तिसरा मृत्यू झाला आहे. मुंबईत या व्यक्तीवर उपचार सुरू होते. देशभरात कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणि धोका आणखी वाढू नये यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
हे वाचा-तंबाखूची तलफ आल्यानं कर्फ्यूदरम्यान बाहेर पडला, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO
हे वाचा-Fact Check : खरंच कोरोना व्हायरस पृथ्वीवरून निघून जात आहे?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.