मुंबई, 02 एप्रिल : देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आज लॉकडाऊनचा 9 वा दिवस आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी नागरिकांसोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते अनेक विषयांवर बोलले. त्यापैकी आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे #21days घरी राहून काय करायचं? असा ज्यांना प्रश्न पडला आहे. त्या सर्वांना शरद पवार यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे.
'उरलेले दिवस हे व्यक्तीमत्त्व विकास करण्यासाठी द्याययला हवेत. आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल किंवा छंद असेल तर तो जोपासा. एखादी कला अवगत असेल तर ती जोपासण्यावर या दिवसांमध्ये भर द्या. यासोबतच वाचन संस्कृती समृद्ध करायला हवी हे सांगताना त्यांनी आजच्या तरुणाईसाठी अनेक पुस्तकांची यादी देखील दिली आहे. महात्मा फुलेनी केलेलं लिखाण त्यात समाज परिवर्तन , स्त्री शिक्षण, शेती विषयावर भाष्य केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनावर उत्तम लिहिलं आहे. त्यांनी देशाला आणि जगाला विचार दिला. त्यांचे विचार वाचायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र माहित असायला हवं. याशिवाय विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यांची चरित्र वाचा. अनेक पुस्तकं या व्यक्तिमत्वावर लिहिलेली आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन देतील अशी देखील अनेक पुस्तकं आहेत. व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी वेळेचा सद्उपयोग आणि योग्य वापर करायला हवा', असंही यावेळी शरद पवार म्हणाले. त्यांनी स्वत: गीतरामायण ऐकण्यात, वाचन करण्यात आपला बराचसा वेळ घालवला आहे.
आपल्याकडे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विपुल लिखाण आहे. त्याचा आस्वाद घेऊन आपले ज्ञान वाढवण्याचे काम करा.#LetsFightCoronaTogether
हे वाचा-लॉकडाऊनमध्येही लेकाने पूर्ण केली आईची शेवटची इच्छा, डोळ्यांत अश्रू आणणारा क्षण
याव्यतिरिक्त त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवरही जनतेला आवाहन केलं आहे. तर दिल्लीतील तबलिगी जमात यांच्या मरकजच्या कार्यक्रमावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं आहे. 'या कार्यक्रमामुळे संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. तबलिगी जमातचा निजामुद्दीन इथे झालेला सोहळा टाळता आला असता पण तसं घडलं नाही. त्याचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे. अनेक ठिकाणी अजूनही सार्वजनिक कार्यक्रम होताना दिसत आहेत. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याकडे एक महिना आधीपासून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे नेता येईल का याचाही विचार आपण करायला हवा.' असं महाराष्ट्रात घडू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला केलं आहे.
हे वाचा-VIDEO कोरोनाला रोखण्यासाठी नागपूरच्या डॉक्टरने तयार केला ‘सेफ्टी बॉक्स'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.