Home /News /maharashtra /

मनोरुग्णांना हात लावण्यास घाबरत होते कर्मचारी, उपायुक्तांच्या 'या' कार्याचं तुम्हीही कराल कौतुक!

मनोरुग्णांना हात लावण्यास घाबरत होते कर्मचारी, उपायुक्तांच्या 'या' कार्याचं तुम्हीही कराल कौतुक!

या कठीण प्रसंगात समाज कल्याण उपायुक्त हे देवदूत म्हणून धावून आले आहेत. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बीड,  10 एप्रिल : कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहे. परंतु, या परिस्थिती माणुसकीचे अनोखे चित्र बीडमध्ये पाहण्यास मिळाले आहे.  रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या मदतीला समाजकल्याण उपयुक्त धावून आले आणि चक्क हातांमध्ये कात्री घेत 64 मनोरुग्णांचे केशकर्तन करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. लॉकडाउनमुळे सर्व काही ठप्प आहे. या दरम्यान मनोरुग्णांचे मोठे हाल होत आहेत. एरवी लोकं दिसले की, पळून जाणारे मनोरुग्ण आता रस्ते निर्मनुष्य झाल्याने रस्त्याच्या कडेला येऊन बसत आहेत. या किळसवाण्या वाटणाऱ्या व्यक्तीकडे नेहमीच दुर्लक्षित होते. हेही वाचा -नाशिकमध्ये झपाट्याने पसरतोय कोरोना, माळेगावमधील 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह या लोकांना स्वच्छ करण्याची मोहीम समाजकल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी बोलून दाखवली होती. पण कुणीच पुढे येण्यास तयार नव्हते. सगळयात महत्वाचं म्हणजे त्यांचे वाढलेले केस, यामुळे विद्रुप दिसणाऱ्यांजवळ जायला कोणी धजवत नव्हते. अखेर सचिन मडावी यांनीच हातात कात्री आणि मशीन घेऊन या मनोरुग्णांची स्वच्छता केली. त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीडमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने मनोरुग्ण व्यक्तींसाठी स्पेशल मोहीम हाती घेतली आहे. या मनोरुग्णांच्या दोन वेळेच्या भोजनाची सोय देखील केली जात आहे. याहूनही पलिकडे समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या शहरात सार्वजनिक पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मनोरुग्णांना स्वच्छ होता येत नाही. त्यामुळे अस्वच्छतेमुळे त्यांच्यात संसर्गात वाढ होऊ नये यासाठी समाज कल्याण उपायुक्त मडावी यांनी शहरातील मनोरुग्णांचे केस कर्तन सुरू केले आहे. हेही वाचा -एप्रिल अखेरीस कोरोनापासून होणार सुटका? असा आहे मोदी सरकारचा प्लॅन आतापर्यंत तब्बल 64 मनोरुग्णांचे स्वच्छता करून त्यांना निवारा ग्रहात आश्रय देण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा धसका सर्वसामान्य नागरिकांसोबतच प्रशासनाने घेतला आहे. या कठीण प्रसंगात समाज कल्याण उपायुक्त हे देवदूत म्हणून धावून आले आहेत. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या