Home /News /maharashtra /

अख्खी डोंबिवली 'ज्या' तरुणामुळे हादरली, अखेर त्याच्याबद्दल आली चांगली बातमी!

अख्खी डोंबिवली 'ज्या' तरुणामुळे हादरली, अखेर त्याच्याबद्दल आली चांगली बातमी!

परंतु,या तरुणाला आता 19 एप्रिलपर्यंत सक्तपणे घरात राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.

डोंबिवली, 06 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. खबरदारी म्हणून सर्वांना घरात राहण्याचं आवाहन केलं जात आहे. परंतु, डोंबिवलीमध्ये एका कोरोनाबाधित तरुणाने लग्न आणि हळदीत हजेरी लावल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एवढंच नाहीतर त्याच्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली होती. अखेर या तरुणाने आता कोरोनावर मात केली आहे. डोंबिवलीमध्ये लग्नातून संसर्ग पसरवणाऱ्या तरुणाला कस्तुरबा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या तरुणाच्या 29 मार्च आणि 1 एप्रिलला दोन चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही चाचण्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे या तरुणाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु,   या तरुणाला आता 19 एप्रिलपर्यंत सक्तपणे घरात राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे. हेही वाचा -राज ठाकरेंचा तबलिगींना इशारा, मुस्लीम मंडळाने व्यक्त केली भीती,म्हणाले... यापूर्वी  हा तरुण तुर्कीहुन १५ मार्च रोजी आला होता. परंतु, घरी आल्यानंतर  त्याला होम क्वारंटाइन राहण्याची सूचना करण्यात आली होती. पण, म्हात्रेनगर इथे 18 मार्च रोजी हळद आणि 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड इथे विवाह समारंभ पार पडला, या दोन्ही या समारंभात हा तरुण उपस्थित राहिला होता. ज्यामुळे डोंबिवलीत अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. महापौरांना व्हावं लागलं होम क्वारंटाइन या घटनेनंतर पोलिसांनी डोंबिवलीतील मढवी बंगला इथला परिसर पूर्णपणे लॉकडॉऊन केला होता. या लग्न सोहळ्याला महापौर विनिता राणे यांच्यासह इतर पदाधिकारीही हजर होते. त्यामुळे राणे यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं. हेही वाचा - पोलीस मदत करत नाहीत असं वाटत असेल तर चुकीचं, गर्भवती महिलेनं शेअर केला अनुभव तसंच, या लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक होता. एवढंच नाहीतर या तरुणाच्या मित्रालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होते. डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल दरम्यान, या प्रकरणाची साथीचा रोग पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना पसरवल्याच्या आरोपाखाली डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल केले आहे. यात कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केलाच तर लग्न असलेल्यांवर आणि जागामालकावर गुन्हा दाखल केलेला आहे. भादंवि कलम 188, 269, 270, 271 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या 34 वर यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्‍णसंख्‍या आतापर्यत 34 वर पोहोचली आहे. त्‍यापैकी डोंबिवली येथील लग्‍न सोहळयाशी संबंधित एका रुग्‍णाला कस्‍तुरबा रुग्‍णालयातून पुर्नतपासणी अंती डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्‍या रुग्‍णांची संख्‍या सहा झाली आहे. यात 4  कल्‍याण आणि 2 डोंबिवलीमधील रुग्णांचा समावेश आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या