लॉकडाऊनमध्ये स्पर्धेचं आयोजन, तुम्हीही घेऊ शकता ऑनलाइन सहभाग

लॉकडाऊनमध्ये स्पर्धेचं आयोजन, तुम्हीही घेऊ शकता ऑनलाइन सहभाग

या स्पर्धेत सहभागी कसं व्हायचं कुठे होणार कशी असणार आता अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. ह्या स्पर्धेत तुम्ही घरी बसूनही सहभाग घेऊ शकता कसं असेल स्वरूप जाणून घ्या.

  • Share this:

बेळगाव, 09 एप्रिल : देशभऱात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत देशभरात 5 हजार 200 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर महाराष्ट्रात हा आकडा 1 हजार 50 हून अधिक नागरिकांचा सामवेश आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनही वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. अशातच आता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी कसं व्हायचं कुठे होणार कशी असणार आता अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. ह्या स्पर्धेत तुम्ही घरी बसूनही सहभाग घेऊ शकता कसं असेल स्वरूप जाणून घेऊया.

बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणी तालुक्यातील भिवशी गावामध्ये या अनोख्या स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे. YES ग्रूपच्या वतीने ही ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या महासंकटापासून देशाला वाचवण्यासाठी 'कोरोनापासून देशाला कसे वाचवता येईल ? 'हा विषय या स्पर्धेसाठी देण्यात आला आहे. सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या व्यक्तींनी आपलं नाव आणि विषय मांडवा आणि त्याचा व्हिडीओ तयार करून 7 ते 8 मिनिटांमध्ये रेकॉर्ड करून व्हॉट्सअॅपवर पाठवायच आहे.

हे वाचा-कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज, पोलिसांचा शोध सुरू

या स्पर्धेसाठी भाषण पाठवण्याची तारीख 12 एप्रिल असून 14 एप्रिल रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे विजेत्या स्पर्धकांसाठी रोख रक्कम आणि प्रमाणपत्र अशी बक्षीस ठेवण्यात आली असून रोख रक्कम ही विजेत्याच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे तर प्रमाणपत्र हे कुरिअरने पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल.ही स्पर्धा मराठी भाषेतूनच असून देशभरातला कुठलाही स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो अस आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.

सध्या कोरोनाबाबत जनजागृती गरजेची आहे ती केलीही जातेय प्रशासन, राज्य सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन कऱण्यात आलं आहे. भिवशी गावातल्या YES ग्रुपने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे सध्या कौतुक होत आहे.

हे वाचा-'तुझ्या कुटुंबाला कोरोना झालाय' म्हणत तरुणाला मारहाण, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 9, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या