अरेरे...भुकेलेल्यांना अन्नदान केलं आणि परतत असताना दोन मित्रांचा मृत्यू, रिक्षाच उलटली

'समाजकार्य करत असतानाही सगळ्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे, कायम सावध असलं पाहिजे.'

'समाजकार्य करत असतानाही सगळ्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे, कायम सावध असलं पाहिजे.'

  • Share this:
मुंबई 08 एप्रिल : कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अन्नदान करून, परतणाऱ्या अमळनेर इथल्या दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला. झाडी गावा जवळ रिक्षा पलटी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून चार तरुण जखमी आहेत. रात्री साडे सात वाजता ही घटना घडली आहे.  ऋषिकेश शेटे आणि विशाल पाटकरी अशी त्या मित्रांची नावं आहेत. तर जयेश पाटील, अक्षय महाजन, आणि चेतन चौधरी आणि आणखी एक तरूण हा जखमी झाला. हे तरुण शिरूड नाका भागातील श्रीराम कॉलनी भागातले असल्याचे समजते, सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, हे तरुण अन्नदान करण्यासाठी रिक्षा घेऊन गलवाडे, झाडी, मुडी येथे गेले होते, परत येत असताना झाडी गावा जवळ हा अपघात झाला. अमळनेरकरांसाठी अतिशय दुर्दैवी घटना असून असं समाजकार्य करत असतानाही सगळ्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

राज्यात आज 117 नवीन कोरोनारुग्ण दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1135 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 72 जणांचा Coronavirus मुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरातले कोरोनाव्हायरस साथीसंदर्भातले अपडेट्स. या बातम्या रात्री 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकड्यांवर आणि माहितीवर आधारित आहेत.

कोरोना: बायकोला केमोथेरेपीला एकटीच, नवऱ्याने जे केलं ते पाहून डोळ्यात पाणी

1. मुंबई हा फक्त राज्याचाच नाही तर देशाचा कोरोना हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत आज कोरोनाचे 106 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 696 एवढी झालीय. तर 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 45 झाली आहे. 2. पुण्यात Coronavirus  चं थैमान सुरूच आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, तसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पुण्यात दुपारपर्यंत 5 मृत्यूंची नोंद झाली होती. आणखी 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी आता आली आहे. त्यामुळे दिवसभरात पुण्यात कोरोनाचे 8 बळी गेले. हा आतापर्यंतचा मोठा आणि चिंता वाढवणारा आकडा आहे. 3. बारामती शहरात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकाच  कुटुंबातील वडीलांसह, मुलगा, सून, आठ वर्षाची मुलगी आणि एक वर्षाच्या नातीला कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून आता शहरातील भाजीविक्रेते, मासळी आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. LockDown : वेडेपणाचा कहर! 80 रुपये वाचवण्यासाठी केला 386 किमींचा प्रवास 4. मुंबईबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली पूर्वेत आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोन महिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या दोन्ही महिला एकाच कुटुंबातील आहेत. आता कल्याण- डोंबिवलीत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. 5. 'आपण कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहोत', असं वक्तव्य अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. कोरोनापासून दूर असलेल्या अकोल्यात मागील 24 तासांपासून दोन रुग्ण सापडल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्येही काहीसं चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात 8 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातल्या 7 जणांचे 'तबलिगी' कनेक्शन समोर येत आहे. सविस्तर इथे वाचा.    
First published: