Home /News /maharashtra /

उतावळा नवरा घुडघ्याला बाशिंग, फक्त गृहप्रवेशासाठी पठ्ठ्यानं केली 30 किलोमीटरची पायपीट

उतावळा नवरा घुडघ्याला बाशिंग, फक्त गृहप्रवेशासाठी पठ्ठ्यानं केली 30 किलोमीटरची पायपीट

जोडपं आनंदाने नाचत जात असताना त्यांना पाहून नागरिकही आश्चर्चचकीत झाले.

    अहेरी, 04 जुलै : चीनच्या वुहानपासून पसरलेल्या कोरोनानं भारतातच नाही तर जगभरात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला आणि संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या कोरोनानं लग्नसराईवर विरजण घातलं आहे. अनेकांनी लग्न पुढे ढकलली तर काही जणांनी परस्पर परवानगी काढून कोरोनाचे नियम पाळून लग्न उरकून घेतल्याचंही पाहायला मिळालं. असंच एक लग्न तुफान चर्चेचा विषय बनलं आहे. याआधी लग्न करून बायकोला दुचाकीवर बसवून आणणाऱ्या लग्नाची गोष्टी आपण पाहिली होता तसंच आता तब्बल 4 महिने थांबल्यानंतर तेलंगणातील मुलानं गडचिरोलीतील मुलीशी विवाह केला आहे. तेलंगणाच्या युवकानं गडचिरोलीतील मुलीशी विवाह केला. नवरीला घेऊन तब्बल 30 किलोमीटर पायी चालत जाणार आहेत. हे वाचा-पुण्याता कोरोनाचा नाश करण्यासाठी महापौरांनी अजित पवारांकडे केल्या या मागण्या नव्यानं तयार झालेल्या पुलावर तेलंगणा आणि महाराष्ट्रातील नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. हे जोडपं आनंदाने नाचत जात असताना त्यांना पाहून नागरिकही आश्चर्चचकीत झाले. य नवविवाहित जोडप्याला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 4 महिने आम्ही थांबलो आणखीन किती वाट पाहाणार. लॉकडाऊनवर लॉकडाऊन होत आहेत. आमचं लग्न फेब्रुवारीमध्ये ठरलं होतं त्यानंतर चार महिने उलटले. 30 किलोमीटर चालायचं आहे पण आम्ही दोघं एकत्र आल्याचा आनंद आहे. मोजक्या नातेवाईक आणि सोशल डिस्टन्सिंगचं भान बाळगून आम्ही विवाह सोहळा पार पडला आहे. फेब्रुवारी महिन्यात ठरलेला विवाह पुढे ढकलला मात्र आता किती वाट पाहणार असा प्रश्नही होता. त्यामुळे मोजक्या लोकांच्या सोबतीनं हा विवाह संपन्न झाला आहे. संकलन, संपादन-
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus india, Coronavirus symptoms, Maharashtra news, Symptoms of coronavirus, Telangana

    पुढील बातम्या