Home /News /maharashtra /

कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला, पतीचा अपघातात जागीच मृत्यू

कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला, पतीचा अपघातात जागीच मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की, यात किशोर चव्हाण यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पंचवटी, 06 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. परंतु, या संचारबंदी नाशिकमध्ये अपघातात एका माजी सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील पंचवटी भागात  पहाटे 5 वाजेच्या ही घटना घडली आहे. या अपघातात नाशिक महापालिकेच्या माजी सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. किशोर चव्हाण (वय 56) असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हेही वाचा - तबलिकी तरुणानं निजामुद्दीनला गेल्याची माहिती लपवली, पुण्यात तब्बल 40 डॉक्टरांना किशोर चव्हाण यांची पत्नीही पालिकेत सफाई कर्मचारी आहे. दुचाकीवरून ते आपल्या पत्नीला कामावर सोडण्यासाठी जात होते. परंतु, पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटिंगच्या दोरखंडाला अडकल्यामुळे दुचाकी कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात किशोर चव्हाण यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हेही वाचा  -सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळाली 62 हजार कोटींची मदत किशोर चव्हाण नाशिक महानगरपालिका माजी सफाई कर्मचारी होते. चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लाईट बंद होताच पोलीस पाटलाच्या घरावर तुफान दगडफेक

दरम्यान,भिवंडीतील नागरिकांनी लाईट बंद होताचा अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांचे कारनामे सुरू झाले. त्यांनी पिंपळास गावचे पोलीस पाटील अशोक जाधव यांच्या घरावर तुफान दगडकेक केली. पुन्हा लाईट लावेपर्यंत हे अज्ञात तिथून पसार झाले होते. कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. महराष्ट्रात जवळपास 650 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा -तुमच्या घरात अंधार न व्होवो म्हणून 6 महिन्याच्या मुलीला कुशीत घेऊन काम करतेय आई! कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर योजना राबवल्या जात आहे. सरकारकडून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकडाऊन असताना अशा परिस्थिती गावात दारू विक्री होऊ नये,  गावातील काही मोकाट मुले  चौका चौकामधे फिरत असल्याने  त्यांना विरोध करीत  पोलिसांसोबत जनजागृती करीत असल्यामुळे आपल्या घरावर दगडफेक  केल्याचा संशय पोलीस पाटील जाधव यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणी दगडफेक करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या