Coronavirus : राज्यात 74860 रुग्ण; मृत्यूही वाढले पण रुग्णवाढीचा दर झाला कमी

Coronavirus : राज्यात 74860 रुग्ण; मृत्यूही वाढले पण रुग्णवाढीचा दर झाला कमी

एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 122 जणांचा आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. पण कोरोना आता कमी धोकादायक वाटू लागला आहे. हे आहे कारण..

  • Share this:

मुंबई, 3 जून : राज्यात Coronavirus च्या रुग्णांमध्ये वाढ होणं कायम आहे. एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 122 जणांचा आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर आता कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचा धोका आहे.

आज राज्यात 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यात कोरोना बाधितांची संख्या 74860 एवढी झाली आहे. यात सर्वााधिक रुग्ण मुंबईत आहेत 43492 एवढे रुग्ण सध्या मुंबईत आहेत. शहरात आतापर्यंत 1417 जणांचा मृत्यू नोंदला गेला आहे.

1 मे ते 1 जून या कालावधीत राज्यातील रुग्णवाढीचा वेग कमी होत असून 1 जूनला तो देशाच्या सरासरीपेक्षाही कमी झाला आहे. सध्या देशात 4.74 टक्के या दराने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी लांबला आहे. त्यामुळे हीदेखील दिलासादायी बाब आहे, असं आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 43.18 टक्के

मृत्यूदर - 3.45 टक्के

सध्या राज्यात 5,71,915 लोक होम क्वारंटाइन आहेत. 33,674 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5℅ दिवसांवर गेला आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे, असं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येतं आहे.

आठवडाभरापूर्वी म्हणजे 27 मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत नवीन कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 5.17 टक्के  होता. जो 2 जूनला 3.64 टक्के झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.

अन्य बातम्या

निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्यात राज्यात गेला 2 जणांचा बळी, कोट्यवधींचं नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात आज कोणतीही प्रगती नाही - हवामान विभाग

First published: June 3, 2020, 8:18 PM IST

ताज्या बातम्या