महाराष्ट्रात संसर्ग वाढतोय, पण मृत्यूदर होतोय कमी! ही पाहा ताजी आकडेवारी
महाराष्ट्रात संसर्ग वाढतोय, पण मृत्यूदर होतोय कमी! ही पाहा ताजी आकडेवारी
दररोज येणाऱ्या आकडेवारीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असलेली दिसली, तरी मृत्यूदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. म्हणजेच Covid-19 हा जीवघेणा आजार नाही, हे आता स्पष्ट होत आहे.
मुंबई, 23 मे :महाराष्ट्रात Coronavirus चा संसर्ग सुरू झाला, त्या वेळी कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक होतं. सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात होता. आता दररोज येणाऱ्या आकडेवारीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असलेली दिसली, तरी मृत्यूदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणारे रुग्णही कमी होत आहेत. आज दिवसभरात 698 रुग्णांना बरं झाल्याने घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत 18616 रुग्ण आजारावर मात करत घरी गेले आहेत. म्हणजेच Covid-19 हा जीवघेणा आजार नाही, हे आता महाराष्ट्र सिद्ध करत आहे.
मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2598 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 85 कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. मृतांमध्ये फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा विषाणू राज्यभर पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे.
आज मृत्युमुखी पडल्याची नोंद झालेल्या 85 पैकी 38 मुंबईतले तर 10 पुण्यातले रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 1982 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे.
मृत्यूदर झाला कमी
राज्यात मृत्यूदर सुरुवातीला 4 टक्क्यांपेक्षा जास्त होता. तो आता 3.32 टक्क्यांवर आला आहे. आजारातून बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढल्याने रिकव्हरी रेटही वाढून 31.26 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आज कोरोनाबळींची संख्या 85
मुंबई 38
ठाणे 4
नवी मुंबई 2
वसई-विरार 4
रायगड 1
जळगाव 1
पुणे 10
सातारा 9
सोलापूर 7
अकोला 5
औरंगाबाद 3
नांदेड - 1
राज्य सरकारने गुरुवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 59546 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात देशात झालेल्या चाचण्यांच्या 12 टक्के चाचण्या झाल्या आहेत. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 6 लाख 12 हजार 745 जण आहेत तर 35122 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे.
आज दिवसभरात
नवे रुग्ण 2190
मृत्यू--105
एकूण मृत्यू-- 1897
एकूण- 56948
अन्य बातम्याकोरोनाच्या संकटात या राज्याचं मोठं पाऊल; 47000 कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगारLockdown मध्ये वडिलांना सायकलवरुन नेणाऱ्या ज्योतीची संघर्षकथा मोठ्या पडद्यावरमहाराष्ट्रात IPS आणि IAS अधिकाऱ्यांनाही कोरोनाने ग्रासलंआणखी 15 दिवस वाढवला जाऊ शकतो Lockdown या क्षेत्रांना मिळू शकते सुट फक्त 2 आठवड्यात तब्बल 65 लाख लोकांची कोरोना टेस्ट; वुहानने नेमकं केली तरी कशी?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.