मुंबई 9 जून : राज्यात रुग्णवाढीचा दर मंदावल्याचा दावा सरकारने केला असला, तरी दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाच्या संख्येत कपात झालेली दिसत नाही. आज दिवसभरात 3752 रुग्ण वाढले. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदरही देशाच्या तुलनेत जास्तच आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.77 झाला आहे.
आज दिवसभरात 1672 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ कायम आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णवाढीचा दर कमी झाल्याची नोंद दिसते. 16 जूनच्या आठवड्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 3 टक्क्यांवर आला आहे. तो 31 मे च्या आठवड्यात 4 टक्के होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ही आकडेवारी समोर दिसत आहे.
कोरोनाचं सावट! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गणेश मंडळांना केलं महत्त्वाचं अपील
एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 100 जणांचा आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. गेल्या आठवड्यात राज्यात दररोज 2 ते अडीच हजार नवे रुग्ण सापडत होते. आता दररोज साडेतीन - 4 हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 120504 झाली आहे. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 53,901 आहे.
अनलॉक फेज सुरू झाल्यानंतर आता पावसाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 50.49 टक्के
मृत्यूदर - 4.77 टक्के
सध्या राज्यात 5,81,650 लोक होम क्वारंटाइन आहेत. 26740 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 25.9 दिवसांवर गेला आहे.
मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे, असं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येतं आहे.
संकलन - अरुंधती
अन्य बातम्या
पुरावा आला समोर; चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारायला वापरले हे खिळ्यांचे रॉड
आईची औषधं, शिक्षणासाठी जीवाची पर्वा नाही; विद्यार्थी रुग्णालयात करतोय हे काम
अनलॉक 1 मध्ये तामिळनाडू राज्यानं पुन्हा लागू केला कडक लॉकडाऊन