महाराष्ट्रातल्या 36 पैकी 28 जिल्ह्यांत कोरोना पुन्हा वाढला; मुंबई-पुण्याबाहेर नवे हॉटस्पॉट

महाराष्ट्रातल्या 36 पैकी 28 जिल्ह्यांत कोरोना पुन्हा वाढला; मुंबई-पुण्याबाहेर नवे हॉटस्पॉट

महाराष्ट्रात coronavirus चं थैमान नव्याने सुरू झालं आहे. कोरोनाचा केंद्रबिंदू आता पुण्या-मुंबईबाहेर पसरलाय हा खऱ्या चिंतेचा विषय आहे. एक तृतीयांश जिल्हे यामुळे प्रभावित झाले आहेत आणि त्यातले दोन ठरले आहेत नवे Corona Hot Spots

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus Maharashtra Updates) पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र हां हां म्हणताना राज्याच्या 36पैकी 28 जिल्ह्यांत दिसू लागलं आहे. गेल्या दोन आठवड्यांत या जिल्ह्यांत दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत वेगाने वाढ होत आहे. 10 दिवसांपूर्वी 21 जिल्ह्यांत दिसत असलेलं हे चित्र आता 28 जिल्ह्यांत दिसू लागलं आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

राज्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, अमरावती (Amaravati), अकोला (Akola), यवतमाळ (Yavatmal) आदी ठिकाणी नवे हॉटस्पॉट्स (Hotspots) बनत चालले आहेत.

फेब्रुवारीत आलेल्या लाटेचा (Surge) केंद्रबिंदू विदर्भात असून, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे आणि अमरावती या ठिकाणीही रुग्णसंख्या वाढत आहे. या पाच जिल्ह्यांतल्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या राज्यातल्या एकूण सक्रिय कोरोनाबाधितांच्या सुमारे 65 टक्के एवढी आहे. मुंबईच्या तुलनेत नागपुरात (Nagpur) नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण अधिक असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबईची लोकसंख्या 130 लाख, तर नागपूरची लोकसंख्या 50 लाख आहे. नवे रुग्ण सापडण्याचं राज्यातलं सर्वांत जास्त म्हणजे 41.5 टक्के प्रमाण अमरावतीत आहे.

कोरोना रुग्णांचा भररस्त्यात गोंधळ; औरंगाबादच्या Covid सेंटरसमोरील VIDEO

शुक्रवारी मुंबईत 1034 नवे कोरोनाबाधित आढळले, तर तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 23 हजार 877 झाली, तर मृतांची संख्या 11 हजार 461 वर पोहोचली. मुंबईत 1000हून अधिक नवे रुग्ण सापडण्याचा शुक्रवार हा सलग तिसरा दिवस होता. बुधवारी 1145, तर गुरुवारी 1167 नवे कोरोनाबाधित आढळले होते. नागपुरात शुक्रवारी 1074 नवे रुग्ण आणि सहा मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 47 हजार 905 झाली असून, मृतांची संख्या 4320 झाली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) माहितीनुसार, रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा दर 18 फेब्रुवारीला 0.17 टक्के होता, तो आता 0.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसंच, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 417 दिवसांवरून 256 दिवसांवर आला आहे.

1 मार्चपासून तुम्हालाही मिळणार CORONA VACCINE; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 15 ते 21 फेब्रुवारी या आठवड्यात रुग्णवाढीचा सर्वाधिक दर अमरावतीत 19.4 टक्के एवढा होता. अकोल्यात तो 10.5 टक्के, तर बुलढाण्यात 6.1 टक्के होता.

राज्य पातळीवरील एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि औरंगाबादमध्येही एक फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला तपासण्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असंही त्या अधिकाऱ्याने सांगितलं.

First published: February 27, 2021, 4:44 PM IST

ताज्या बातम्या