60 सेकंदात वाचा - दिवसभरातले 14 महत्त्वाचे अपडेट्स

60 सेकंदात वाचा - दिवसभरातले 14 महत्त्वाचे अपडेट्स

Coronavirus चे देशभरातले अपडेट्स, महाराष्ट्रात लॉकडाऊनचे बदलले नियम आणि इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका नजरेत एका मिनिटात...

  • Share this:

1. Good News - भारताची स्थिती सुधारली; पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर झाला कमी. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने देशात शंभरी ओलांडल्यानंतर पहिल्यांदाच रुग्णवाढीचा दर एवढा कमी झाला आहे.

2. शुक्रवार सकाळपासूनच्या 24 तासात देशभरात 1,429 रुग्ण वाढले. ही वाढ गेल्या अनेक दिवसांतली कमी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाने 779 बळी घेतले आहेत. देशात सध्या कोरोनारुग्णांची संख्या 24,942 झाली आहे.

3. महाराष्ट्रात आज 811 नवीन रुग्ण सापडले तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आता एकूण 7628 कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत रुग्णांच्या आकड्याने 5000 चा टप्पा ओलांडला आहे.

4. आजपर्यंत मुंबईत एकूण 5049 कोरोनारुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 191 मृत्यू नोंदले गेले आहेत.

5. आज राज्यात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील मुंबईत 13 रुग्ण आहेत पुणे महापालिकेच्या हद्दीत 4 तर मालेगाव येथील 1 पुणे ग्रामीण मध्ये 1 पिंपरी-चिंचवडमध्ये 1 धुळे आणि सोलापूर शहरात प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे.

6. कोरोना विरुद्धच्या लढाईत  महाराष्ट्राने गाठला मोठा टप्पा, COVIDE 19च्या झाल्या तब्बल 1 लाख टेस्ट. आजपर्यंत राज्यात 1 लाख 8 हजार 972 नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 485जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 6817 जण पॉझिटिव्ह आले.

7. खासगी डॉक्टरांना इशारा - मुंबईसह उपनगरात लॉकडाऊनच्या काळात जे नर्सिंग होम आणि खासगी दवाखाने बंद आहेत, अशा दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बंद असणाऱ्या खासगी दवाखान्यांवर 'एपिडेमिक अॅक्ट 1897' (साथरोग कायदा 1897) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

8.  दोन कोरोना योद्धांचा बळी, मुंबईत पोलिस तर मालेगावात डॉक्टराचा मृत्यू. मृत पोलिस कॉन्स्टेबल 57 वर्षांचा असून वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते.नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात शनिवारी एका 71 वर्षीय डॉक्टरचा कोरोनानं बळी घेतला आहे. संबंधित डॉक्टर कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

9. पुण्यामुंबईत लॉकडाऊन वाढणार -  3 मे पर्यंत देशाचा लॉकडाऊन संपला तरी राज्यातल्या हॉटस्पॉटमध्ये टाळेबंदी पुढचा किमान महिनाभर तरी सुरू राहील, असे संकेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

10. राज्यात मुंबई नंतर पुण्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर खबरदारी म्हणून गरज पडली तर शहरातली खासगी हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स अधिग्रहित करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

11. Coronavirus चा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यात वाढल्यामुळे केंद्रीय पथक पाहणीसाठी ठाण्यात दाखल झालं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीनं सर्वेक्षण आणि संस्थात्मक क्वारंटाइन करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना या पथकाने दिल्या आहेत.

12. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशातील सराफा बाजार बंद आहे. याचा परिणाम साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय्य तृतीया सणावर होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच अक्षय्य तृतीया हा सण सोने खरेदीशिवाय साजरा होणार आहे.

13. दारुविक्रीसंदर्भात निर्णय झालेला नसला तरी वाईन शॉप्स मालकांनी तयारी सुरू केली आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठीचे आराखडेही तयार करण्यात येत आहेत. तर मद्य प्रेमींचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत.

14. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 6 महिन्यांच्या चिमुरड्याने कोरोनाविरुद्ध लढा जिंकला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली आहे. या बाळासह या रुग्णालयातल्या आणखी तिघांनाही डिस्चार्ज मिळाला आहे.

First published: April 25, 2020, 8:53 PM IST

ताज्या बातम्या