मुंबईत लाखाचा टप्पा पार, तर राज्यात झाले 3 लाख रुग्ण; Coronavirus ची दहशत कायम

मुंबईत लाखाचा टप्पा पार, तर राज्यात झाले 3 लाख रुग्ण; Coronavirus ची दहशत कायम

कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : Coronavirus ची दहशत राज्यात (Maharashtra coronavirus updates) कायम आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.

आज राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,00,937वर गेली आहे. तर एकूण मृत्यू 11596 एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज 1186 नवे रुग्ण आढळले तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,00,350 एवढी झाली. तर आत्तापर्यंत 5650 जणांचा मृत्यू झाला.

18 जुलैपर्यंतची रुग्णसंख्या

मुंबई 1,00,350  आणि मृत्यू  - 5650

महाराष्ट्र 3,00,937 आणि मृत्यू - 11596

दरम्यान, भारतात तयार होत असलेल्या कोवॅक्सिन (Covaxin) नावाच्या लशीची पहिली मानवी चाचणी येत्या ऑगस्टमध्ये सुरू होईल. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 60 जणांची निवड करण्यात आली आहे.  त्यांना या पहिल्या चाचणीअंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात (COVID Vaccine) लस टोचण्यात येईल. नागपूरमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

मोठी बातमी! स्वदेशी कोरोना लशीच्या पहिल्या चाचणीसाठी महाराष्ट्रात 60 जण तयार

हैदराबादच्या भारत बायोटेकच्या वतीने कोवॅक्सिनची निर्मिती केली जात आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (NIV) सहभागातून ही लस विकसित केली जात आहे. याला ICMR ने मान्यता दिली आहे आणि पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिली लस बिहारमध्ये पाटण्यातल्या एम्स रुग्णालयात टोचण्यात आली.

तिरुपतीत दर्शन सुरु होताच ‘कोरोना’चा प्रवेश, 21 पुजारी POSITIVE

त्यानंतर हरियाणातही काही जणांना लस देण्यात आली. हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीजीआय रोहतमध्ये कोरोना लस कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. 17 जुलैला तीन जणांना ही लस देण्यात आली. लशीचा त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 18, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या