लॉकडाऊनमध्ये तरुण चढला बोहल्यावर, पत्नीला बाईकवरूनआणलं घरी

लॉकडाऊनमध्ये तरुण चढला बोहल्यावर, पत्नीला बाईकवरूनआणलं घरी

लोकांची गर्दी नाही, वरात नाही आणि गाडी-घोडे नाहीत फक्त नवरी मुलगी आणि नवरदेव यांनी लग्नगाठ बांधली आहे.

  • Share this:

बांदा, 19 एप्रिल: कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. आतापर्यंत देशभरात 15 हजारहून अधिक लोकांना लागण झाली आहे. या संसर्ग रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. कोरोनाचा फटका विविध क्षेत्राला जसा बसला आहे तसा मोठा परिणाम लग्न समारंभांवरही झाला आहे. 6 महिन्यांपूर्वी ठरलेली लग्न अनेकांनी पुढे ढकलली आहेत तर काही जण लॉकडाऊनचे नियम पाळून लग्न करताना दिसत आहे. फेसबुक, व्हिडीओ कॉलिंगद्वारे लग्न सोहळे पार पडत असल्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसात व्हायरल झाले होते. पण सिंधुदुर्गात अनोख्या पद्धतीनं लॉकडाऊनचा नियम पाळून लग्न समारंभ पार पडला आहे.

हे वाचा-खेळता खेळताच थांबला आयुष्याचा प्रवास, करंट लागून 3 वर्षीय मुलाचा मृत्यू

लोकांची गर्दी नाही, वरात नाही आणि गाडी-घोडे नाहीत फक्त नवरी मुलगी आणि नवरदेव यांनी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबियांची परवानगी होती. एप्रिल महिन्यात दोघांच्या लग्नची तारीख पक्की झालं मात्र महामारीच्या संकटानं स्वप्नांवर पाणी फिरणार होतं. पण दोघांनी युक्ती केली. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी आधी प्रशासनाकडून परवानगी मिळवली. त्यानंतर नवरी मुलगी-नवरदेव पुजारी आणि मोजून 5 लोकांमध्ये मिळून लग्न समारंभ पार पाडला. दोघही मास्क घालून मंदिरात लग्नसाठी बोहल्यावर चढले. बांदा इथल्या महालक्ष्मी मंगल कार्यालयात लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर नवरदेवानं पत्नीला बाइकवरून बसवून घरी आणलं.

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजार 712 वर गेला आहे. तर 12 तासांत 19 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं देशात आतापर्यंत 507 जणांचा या व्हायरसच्या संसर्गानं मृत्यू झाला आहे. 2 हजार हून अधिक रुग्णांनी कोरोनाविरुद्ध लढा यशस्वीपणे लढला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर न पडण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

हे वाचा-चिंता वाढली! 29 दिवस आयसोलेशनमध्ये राहिलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 19, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या