महापालिकेचा गलथान कारभार, रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही ठेवलं कोरोनाग्रस्तांमध्ये

महापालिकेचा गलथान कारभार, रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही ठेवलं कोरोनाग्रस्तांमध्ये

कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही या दोन सदस्यांना कोरोनाग्रस्तांमध्ये 5 दिवस ठेवण्यात आलं

  • Share this:

नाशिक, 12 जुलै: राज्यासह देशात कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे अनेक नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अशातच नाशिकमध्ये महापालिकेचा गलथान कारभार समोर आला आहे. महापालिकेच्या चुकीमुळे एक दोन तास नाही तर तब्बल 5 दिवस कोरोनाग्रस्तांसोबत राहण्याची वेळ एका तरुणावर आली आहे.

काळे कुटुंबातील एका सदस्याचा रिपोर्ट 4 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्याला क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवण्यात आलं. कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील 4 जुलैपासून क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यापैकी सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं तर दोन जणांचे रिपोर्ट आली नसल्यानं त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. त्यांच्या रिपोर्टबद्दल विचारणा केली असता रिपोर्ट येणं बाकी असल्याचं सांगण्यात आलं, तब्बल 5 दिवस उलटून गेल्यानंतर या दोन्ही सदस्यांनी विचारणा केली असता हा प्रकार चुकून घडल्याचं अजब उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं.

हे वाचा-'हाय ब्लड शुगर’मुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका सर्वाधिक - अभ्यास

कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही या दोन सदस्यांना कोरोनाग्रस्तांमध्ये 5 दिवस ठेवण्यात आलं होतं. या संदर्भात पालिकेकडे विचारणा केली असता चुकून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं. हा गलथान कारभार समोर येऊ नये म्हणून दोघांनाही तातडीनं डिस्चार्जही देण्यात आला. मात्र या घटनेमुळे नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 12, 2020, 9:27 AM IST

ताज्या बातम्या