• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • चिंता वाढली ! राज्यात गेल्या 20 दिवसांत हजाराहून अधिक मुलांना Corona

चिंता वाढली ! राज्यात गेल्या 20 दिवसांत हजाराहून अधिक मुलांना Corona

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Coronavirus in childrens: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

 • Share this:
  जालना, 23 नोव्हेंबर : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली. मात्र, त्याच दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, राज्यात गेल्या 20 दिवसांत 1 हजाराहून अधिक लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग (Children tests positive for covid19) झाल्याचं समोर आलं आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने आता पालकांचीही चिंता वाढली आहे. (more than 1 thousand children tests positive in last 20 days in state) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले होते. तिसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, सुदैवाने तशी परिस्थिती उद्भवली नाही. पण आता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात शाळा सुरू झाल्या असून गेल्या 20 दिवसांत 1 हजाराहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या लहान मुलांमध्ये 11 ते 18 या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. वाचा : आणखी एका कोरोना व्हायरसचा इशारा! उंदीर आणि माकडांपासून होऊ शकेल संक्रमण- स्टडी ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस 70 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना सहव्याधी खूप मोठ्या प्रमाणात असतात. अशा नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच अशा नागरिकांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण जगात बूस्टर डोस देण्याच्या संदर्भात विचार सुरू आहे आणि तशीच मागणी मी आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे. लहान मुलांसाठी लसीकरण 11 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाच्या संदर्भातही मागणी केली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. सीरिअर सिटिझन्ससाठी बूस्टर डोस आणि 11 ते 18 वयोगटातील मुलांसाठी नवीन लसीकरण करणं हे आत्ताच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं वाटतं, तसेच टास्क फोर्सचंही तसेच मत असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. वाचा : सीरम इन्स्टिट्यूटकडे कोव्हिशिल्डच्या 24 कोटींहून अधिक लसी, सरकारला केलं मोठं अपील BMC ने केल्या 13 इमारती सील महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आता कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत कमी येताना दिसत आहे. मात्र, असे असतानाच आता मुंबईतून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी कोरोना बाधितांच्या संख्येमुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील 13 इमारती सील (BMC sealed 13 buildings) केल्या आहेत. जर इमारती सील केल्या नाही तर कोरोना बाधितांची संख्या आणखी झपाट्याने वाढू शकते त्यामुळे बीएमसी अधिकाऱ्यांनी या 13 इमारती सील करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी मुंबईत 195 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने वाढवली चिंता राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण आणि त्यासोबतच लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सरकारने सर्व सेवा, व्यवहार सुरू केले. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मॉल्स, चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, आता दिवाळीनंतर मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे चिंता वाढली आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: