मुंबई, 02 एप्रिल : कोरोना व्हायरसनं देशभरात थैमान घातलं आहे. हा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा नियमित आणि प्रामाणिकपणे पार पडत आहेत. तर अनेक खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासगी क्षेत्रातील कामगार आणि कर्मचारी यांच्या पगार कपात करू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासन निर्णय जारी केला आहेत. 31 मार्च रोजी राज्य शासनाकडून त्या संदर्भात पत्रक काढून आदेश जारी करण्यात आला. खासगी कंपन्यांच्या कामगारांच्या वेतनात कपात केली जाऊ नये असं आवाहन कंपनीच्या अध्यक्ष, मालकांना केलं आहे. राज्य सरकारचा हा आदेश निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्य, व्यापरी वर्गांसाठी लागू करण्यात आला आहे.
हे वाचा-पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
देशभरात कोरोनानं हाहाकार पसरला असताना महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. आजही राज्यात 3 नवे रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात 2 तर बुलडाण्यात एक रुग्ण आढळला. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 वर पोहोचली आहे. बुधवारपर्यंत ही संख्या 335 वर होती. चिंतेची बाब म्हणजे, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली होती. त्यातच आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहे. तर बुलडाण्यात आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन कडक पद्धतीनं पाळला जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, कंपन्या पूर्णपणे 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आणि कामगारांचे पगार कापले जाण्याची भीती होती. मात्र आता पगार न कापण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
हे वाचा-9 वर्षांपूर्वी धोनीने ऐतिहासिक षटकार लगावला तेव्हा तुम्ही काय करत होता?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.