नमाज पठणासाठी मशिदीत जाता येणार नाही, 'रमजान ईद'निमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

नमाज पठणासाठी मशिदीत जाता येणार नाही, 'रमजान ईद'निमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ब्रेक द चेन' (Break the Chain) या मोहीमेअंतर्गत राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी मुस्लीम बांधवांना देखील रमजान ईद (Ramzan Eid 2021) घरच्याघरीच साजरी करावी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मे: राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  ब्रेक द चेन' (Break the Chain) या मोहीमेअंतर्गत राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी आणि संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी कोणताही सण भव्यदिव्य पद्धतीने साजरा करता येणार नाही आहे. यावर्षी मुस्लीम बांधवांना देखील रमजान ईद (Ramzan Eid 2021) घरच्याघरीच साजरी करावी लागणार आहे. मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांना नमाज पठणासाठी एकत्र जमण्यास परवानगी नाही आहे. शिवाय इतरही काही मार्गदर्शक सूचनांचं (Guidelines for Ramzan Eid 2021) त्यांनी पालन करणं बंधनकारक असणार आहे.

यावर्षी 13 एप्रिल 2021 पासुन मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून 13 किंवा 14 मे 2021 (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of COVID-19) राज्यात अतिसंसर्गजन्य परिस्थिती आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाने 13 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या आदेशांचे पालन रमजान ईदला करणे अनिवार्य राहील. त्यानुसार रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागामार्फत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचा-राज्यात कोरोनाचा आलेख घसरतोय; Lockdown वाढणार की शिथिलता येणार? आज होणार निर्णय

1. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन 'ब्रेक द चेन' आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल.

2. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

3. रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळे व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

हे वाचा-कोरोना काळात LICचा मोठा निर्णय, क्लेमची प्रक्रिया झाली सोपी

4. कोरोनाच्या या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम 144 लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

5. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

6. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.

हे वाचा-रत्नागिरीत एकाच कंपनीतील तब्बल 40 कर्मचाऱ्यांना कोरोना

7. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

8कोवीड-१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य,

पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 12, 2021, 7:46 AM IST

ताज्या बातम्या