मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सर शिक्षण नको, खायला देता का? लॉकडाऊनमुळे उपाशी असलेल्या मुलांचा आक्रोश

सर शिक्षण नको, खायला देता का? लॉकडाऊनमुळे उपाशी असलेल्या मुलांचा आक्रोश

औरंगाबादमध्ये मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या दोन वेळेच्या खाण्यापिण्याची भ्रांत असताना ऑनलाईन शिक्षण कुठून घ्यायचं हा प्रश्न पडला आहे.

औरंगाबादमध्ये मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या दोन वेळेच्या खाण्यापिण्याची भ्रांत असताना ऑनलाईन शिक्षण कुठून घ्यायचं हा प्रश्न पडला आहे.

औरंगाबादमध्ये मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या दोन वेळेच्या खाण्यापिण्याची भ्रांत असताना ऑनलाईन शिक्षण कुठून घ्यायचं हा प्रश्न पडला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
औरंगाबाद, 03 मे : कोरोनामुळे देशात अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण घेण्याचा सल्ला दिला जात आहे. पण औरंगाबादमध्ये मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या दोन वेळेच्या खाण्यापिण्याची भ्रांत असताना ऑनलाईन शिक्षण कुठून घ्यायचं हा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे 40 दिवस असलेल्या लॉकडाऊनमुळे कामगार आणि त्यांच्या मुलांची स्थिती अधिक बिकट आहे. हातावर पोट असलेल्या कामगारांची मुलं गेल्या कित्येक दिवसांपासून फक्त खायला मिळावं यासाठी धडपड करत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे आपली व्यथा मांडली आहे. दोन वेळेचं खायला मिळत नाही. त्यात लॉकडाऊनमुळे गेल्या 40 दिवसांपासून काही काम नसल्यानं घरात चूल पेटायचे वांदे आहेत. पोटाची आग मिटवण्यासाठी आम्हाला रस्त्याच्या कडेला बसावं लागतं. तिथेही काही सामाजिक कार्यकर्ते किंवा स्थानिक पोळीभाजी किंवा खायला आणून देतात त्यावर पोट भरायचं. नाहीतर सरकारकडून मदत कधी मिळेल याची वाट पाहात राहाणं एवढंच हातात आहे. पैसे नसल्यानं घरात शिजवायला काही नाही. त्यामुळे उपासमार होत आहे. शिक्षण नको पण पोराला खायला द्या अशी विनंती पालकांनी शिक्षकांकडेही केली आहे. हे वाचा-पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरपोच मिळणार 'ही' सेवा जिथे पोट भरायला पैसा नाही तिथे ऑनलाईन शिक्षण कुठून घेणार. ही संपूर्ण परिस्थिती पाहून शिक्षकांच्याही डोळ्यात पाणी आलं. औरंगाबादच्या मुकुंदवाडी इथली ही भीषण परिस्थिती आहे. गणपतराव जगताप शाळेच्या संस्थापकांनी ही परिस्थिती समजून घेऊन विद्यार्थ्यांना 18 क्विंटल गहू, तांदूळ आणि डाळ वाटली आहे. जवळपास 900 विद्यार्थ्यांना धान्य दिलं आहे. हे धान्य पाहून विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर दिलासा मिळाल्याची भावना होती. खाण्याची भ्रांत असलेल्या या विद्यार्थ्यी आणि पालकांनी शिक्षकांचे आणि शाळेच्या संस्थापकांचे मनापासून आभार मानले. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 52 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा-औरंगाबादमधून आली धक्कादायक बातमी, कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या