Home /News /maharashtra /

महाराष्ट्राचा आणखी एक जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्राचा आणखी एक जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्यावर

ल़ॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही.

जालना, 11 मे : महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यातच आता राज्यातील रेड झोनमध्येही वाढ होऊ लागली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जालना जिल्हाही आता रेड झोनच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. जालन्यात आज दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 13 वर पोहोचल्याने जालना जिल्हा आता रेड झोनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेसह राज्य राखीव दलाच्या जवानाचा समावेश आहे. शहरातील आनंदनगर भागात राहणारी एक महिला जिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. या महिलेसह मालेगाव येथून बंदोबस्त करून परतलेल्या व सध्या जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारन्टाइन करून ठेवण्यात आलेल्या एका जवानाचे स्वॅब काल प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले होते. सदर जवानाचा अहवाल नुकताच जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले असून दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह स्पष्ट झाले आहे. जालना जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 13 झाली असून जालना जिल्हा आता रेड झोनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात जालनेकरांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या