मोठा दिलासा : 'स्वाइन फ्लू'चं केंद्र झालेल्या नाशिकमधून कोरोनाबाबत आनंदाची बातमी

मोठा दिलासा : 'स्वाइन फ्लू'चं केंद्र झालेल्या नाशिकमधून कोरोनाबाबत आनंदाची बातमी

एकीकडे राज्यात वेगळी स्थिती असताना नाशिकवरून मात्र एक आनंदाची बातमी आली आहे.

  • Share this:

नाशिक, 18 मार्च : राज्यातील काही शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सरकारकडून अनेक कठोर पावलं उचलली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी काही बदल करण्यात केले आहेत. एकीकडे राज्यात अशी स्थिती असताना नाशिकवरून मात्र एक आनंदाची बातमी आली आहे.

नाशिकमधील कोरोना कक्षातील चारही संशियतांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकमधील कोरोना कक्षात आतापर्यंत 31 संशयित दाखल झाले. यामध्ये 20 देशातून प्रवास करून आलेले प्रवाशांचा समावेश आहे. यातील सर्व 31 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सध्या विशेष कोरोना कक्षात 5 रुग्ण अंडर ऑब्झअर्व्हेशन असून उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात 'नो कोरोना' असं चित्र असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील तापमान साथीच्या रोगांना पोषक असल्याचं यापूर्वीचा इतिहास सांगतो. कारण राज्यात ज्या ज्या वेळीही स्वाइन फ्ल्यू आणि इतर साथीचे आजार आले तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम नाशिक जिल्ह्यावर झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 'नो करोना' होणं ही मोठी बाब आहे.

कोरोनाबाबत दिलासा मिळाला असताना कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा

कोरोना व्हायरसच्या हाहाकारानंतर इतर शहरांप्रमाणे नाशिकमध्ये अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र याच अघोषित बंदचा वेगळ्या पद्धतीने फायदा घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

नाशिकच्या भद्रकाली भागातील अनेक ठिकाणी बिनधास्त अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये सट्टा, मटका आणि जुगाराचाही समावेश आहे. व्हिडिओ गल्लीतील सगळे पार्लर बंद असून फक्त जुगार सुरू आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे.

खोका मार्केट, कत्तल खाना येथील अवैध धंद्यांवर अलोट गर्दी होत आहे. असं चित्र स्पष्टपणे समोर आल्यानंतर जे आम्हाला दिसतं ते पोलिसांना दिसत नाही का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला आव्हान की पोलिसांचाच आशीर्वाद? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष प्रयत्न करत एक मोहीम राबवली होती. तसंच नागरिकांनी गुन्हेगारीबाबत सतर्क राहून पोलिसांना याबाबत माहिती देण्याची अपेक्षा करण्यात येत होती. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांना नाशिकमधील जे अवैध धंदे दिसत आहेत, ते पोलिसांना दिसत नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

First published: March 18, 2020, 9:49 PM IST

ताज्या बातम्या