मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

FACT CHECK: कोरोनामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रात 14 ते 21 मार्च ऑफिसला जाहीर केली सुट्टी?

FACT CHECK: कोरोनामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रात 14 ते 21 मार्च ऑफिसला जाहीर केली सुट्टी?

केंद्र शासनाने महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांमध्ये 14 ते 21 मार्च सुट्टी जाहीर केल्याचा दावा करत एक पत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 13 मार्च : कोरोना व्हायरसने अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातलेला असताना भारतातही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. हा व्हायरस देशात पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून मोठी काळजी घेतली जात आहे. मात्र त्याचवेळी अफवांचा व्हायरसही डोकं वर काढत आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांमध्ये 14 ते 21 मार्च सुट्टी जाहीर केल्याचा दावा करत एक पत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या नावाने सुट्ट्यांबाबत व्हायरल झालेलं हे पत्र फेक असल्याचं समोर आलं आहे. राज्य शासनाने केंद्राकडे विचारणा केली त्यावर अशा स्वरूपाचे पत्र काढण्यात आले नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे या पत्रावर विश्वास न ठेवता कोणीही अफवा पसरू नये, असं आवाहान राज्य शासनाकडून करण्यात आलं आहे. सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते ' परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास जारी कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. हेही वाचा- 'आम्हाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या', परळीत अजब मागणी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
First published:

पुढील बातम्या