Coronavirus महाराष्ट्रात न येताही शेतकऱ्यांसाठी ठरला धोकायदायक! असा झाला परिणाम

Coronavirus महाराष्ट्रात न येताही शेतकऱ्यांसाठी ठरला धोकायदायक! असा झाला परिणाम

कोरोनाच्या दहशतीमुळे महाराष्ट्रातील व्यवसायावर परिणाम झाला आहे.

  • Share this:

प्रशांत मोहिते, नागपूर, 12 फेब्रुवारी : 'कोरोना' व्हायरसमुळे (Coronavirus) चीनमध्ये अक्षरश: हाहाकार माजला आहे. तिथून येणाऱ्या प्रवाशांमुळे भारतानेही या व्हायरसचा धसका घेतला आहे. मात्र आतापर्यंत चीनमधून भारतात आलेल्या सर्व नागरिकांच्या चाचण्या नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला आहे. असं असलं तरीही कोरोनाच्या दहशतीमुळे महाराष्ट्रातील व्यवसायावर परिणाम झाला आहे.

कोरोनोच्या भीतीमुळे चिकन, मटण विक्री व्यवसायात कमालीची घट झालेली असून विदर्भात हा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. शिवाय अंडी विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची माहिती विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी दिली. दुधबडे म्हणाले, नागपुरात जवळपास आठवड्यात 300 टन चिकन विक्री होत असे. गेल्या आठवड्यापासून 'करोना व्हायरस' याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच अफवा येत आहेत. त्यामुळे या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये 150 टन चिकनची विक्री झाल्याचे दिसते. विदर्भात हा आकडा बराच मोठा आहे.

होलसेलमध्ये 80 रुपये किलोने चिकन विकलं जातं. मात्र, व्हायरसच्या अफवांमुळे ती किंमत 45 रुपये प्रतिकिलोवर आलेली आहे. त्यामुळे प्रतिकोंबडी 30 रुपयांचे नुकसान होत असून दर आठवड्याला शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. केवळ चिकनच नव्हे तर मटण आणि मासोळी विक्रीतही बरीच घट झालेली आहे. अनेक बाजारात मटन विकलं गेलेले नाही. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मासोळीचा व्यवसाय केल्या जातो. अंडे विक्री व्यवसायावरही व्हायरसचा परिणाम दिसून येत आहे.

अफवांना बळी न पडण्याचं आवाहन

'आपल्याला प्रोटीनची खूप आवश्यकता असते. अंड्याच्या आणि चिकनच्या माध्यमातून जे प्रोटीन मिळत ते दुसऱ्या कुठल्याच पदार्थातून मिळू शकत नाही. त्यामुळे चिकन,मटण खा, तंदुरुस्त व्हा आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका,' असं आवाहन विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी केलं आहे.

महाविद्यालयांमध्ये 19 फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत अनिवार्य होणार, उदय सामंत यांची घोषणा

'आपल्या पोटच्या मुलाला जस सांभाळतात तसे शेतकरी आपले पक्षी सांभाळतात. त्यामुळे कोणीही मनामध्ये भीती बाळगू नये. सरकारने सुद्धा पुढे येऊन मोठ्या प्रमाणात याबाबतचा गैरसमज खोडून काढावा,' अशी मागणी कृषी अभ्यासकांनी केली आहे.

First published: February 12, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या