शिर्डी, 24 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पसरत असताना लोकांचा हलगर्जीपणा वारंवार समोर येत आहे. संचारबंदीनंतरही अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, तर भाजीपाल्याच्या बाजारातही मोठी झुंपड उडत आहे. अशातच आता दुबईतून आलेल्या एका तरुणीने स्वत:ला क्वारन्टाइन करून न घेता थेट आपल्या आई वडिलांकडे मुक्काम केल्याची घटना समोर आली आहे.
संबंधित तरूणीने 18 मार्च रोजी दुबई ते दिल्ली विमानतळ आणि त्यानंतर मुंबई असा विमानाने प्रवास केला. तसंच 23 मार्च रोजी मुंबईवरून शिर्डीला एका खाजगी कारने प्रवास केला. चेंबुर येथे उपचार घेत असलेल्या वडिलांचा डीस्चार्ज झाल्यानंतर हे कुटुंब शिर्डीला आले. त्यांसोबत दुबई येथून आलेल्या त्यांच्या मुलीनेही शिर्डीतच मुक्काम केला.
हेही वाचा - दुबई येथे नोकरीस असलेल्या तरुणीचा शिर्डीत मुक्काम, तातडीने रुग्णालयात हलवलं
तरुणीच्या आई - वडिलांचे शिर्डीतील एका सोसायटीत वास्तव्य आहे. या तरूणीने आई - वडिलांसह तरूणीने खासगी कारने मुंबई ते शिर्डी प्रवास केला. मात्र सोसायटीतील एका सजग नागरिकाच्या माहितीवरून प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे.
प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागाने सदर तरुणीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवले असून तपासणी करिता केले जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. दिल्ली विमानतळावर तपासणी करण्यात आली होती, अशी माहिती या तरुणीने प्रशासनाला दिली आहे.