3 मेनंतरही राज्यात लॉकडाऊन वाढवणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही आहे.

राज्यात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही आहे.

  • Share this:
    मुंबई, 25 एप्रिल: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन (India lockdown) कायम ठेवण्यात आला आहे. 3 मे रोजी देशातील काही भागात लॉकडाऊन संपुष्टात आला तरी महाराष्ट्रात 18 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येईल, राज्यातल्या हॉटस्पॉटमध्ये संचारबंदी किमान महिनाभर तरी सुरू राहील, असं सर्वत्र बोललं जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. हेही वाचा..ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! पोलिसांची पुणेकरांसाठी एक खुली ऑफर राज्यात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात येणार नसल्याचे राजेश टोपे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यातील इतर दुकानं तसेच वाईनशॉप उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पूर्णपणे सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे. मात्र, अद्याप लॉकाडाऊन वाढवण्यासंबंधी निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे, अशा ठिकाणी जिल्ह्याच्या पूर्णपणे सीमा बंद करून काही अतिशय महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे. हेही वाचा..सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, ठाण्यात शिवसेनेच्या खासदाराचा 'प्रताप' तुम्हीही पाहा राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार का? देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचे निर्बंधांबाबत मोठा खुलासा केला आहे. राज्यात 3 मेपर्यत लॉकडाऊनच्या नियमावलीत कोणतेही बदल करण्यात येणार नाही, अर्थात कोणतेही निर्बंध शिथिल होणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात दुकाने उघडण्यासंदर्भात केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात कोणतीही स्पष्टता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याची येत्या सोमवारी व्हिडिओ कॉन्फ्रेरन्स मिटींग होणार आहे. त्यात याबाबत सर्व बाबी स्पष्ट होऊ शकतील. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावरही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लॉकडॉऊनच्या काळात 3 मेपर्यत कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर
    First published: