कोरोनाचं थैमान, राज्यातील स्थिती सुधारण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुचवले 4 नवे उपाय

'काही बाबतीत आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट अधिक गडद होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही पर्याय सुचवले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत, पण काही बाबतीत आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी कोणते उपाय सुचवले?

1. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवायचा असेल, बाजार समित्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्याची नितांत गरज आहे.

2. माथाडी कामगारांकडे ओळखपत्र आहेत. पण व्यापारी, वाहतूकदार आणि खरेदीदार हे बाजार समित्यांमध्ये येऊ शकतील, हे सुनिश्चित करावे लागेल. त्यासाठी त्यांना बाजार समितींच्या माध्यमातून ओळखपत्र द्यावे लागेल.

3. बाजार समित्यांमध्ये थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, स्वच्छता यांची व्यवस्था केली, तरच त्यांना हिंमत येईल.

4. वाहन चालक-वाहक यांना ओळखपत्र देतानाच त्या भागातील पोलिसांना सुद्धा तशा सूचना द्यावा लागतील. सध्या बाजार समित्यांकडे येणारी वाहने अडवली जात आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या महानगरांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

अजित पवार म्हणतात... गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करा!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा... कुणीही घराबाहेर पडू नये... रस्त्यावर येऊ नये आणि गर्दी टाळावी असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2020 05:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading