Home /News /maharashtra /

कोरोनाचं थैमान! मुख्यमंत्र्यांनीच घालून दिला आदर्श, बैठकीतील PHOTO ची सर्वत्र चर्चा

कोरोनाचं थैमान! मुख्यमंत्र्यांनीच घालून दिला आदर्श, बैठकीतील PHOTO ची सर्वत्र चर्चा

स्वत: मुख्यमंत्र्यांनीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसमोर आदर्श घालून दिल्याची चर्चा आहे.

    मुंबई, 26 मार्च : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक अशा महत्वाच्या बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. राज्यातील परीस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी ती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सर्वोतोपरी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजवणी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात राज्यातील प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठका घेऊन चर्चा करत आहेत. कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून ही बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्र्यांनीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसमोर आदर्श घालून दिल्याची चर्चा आहे. राज्यपालांनीही घेतला पुढाकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले. हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज, मोदी सरकारच्या 7 मोठ्या घोषणा राज्यपालांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 21 दिवसांच्या संचारबंदीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 14 एप्रिल पर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या कालावधीत जनतेच्या भेटी देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यपाल आपल्या कर्तव्य पालनाकरीता आवश्यक अभ्यागत तसेच अधिकाऱ्यांना या कालावधीत भेटतील, असे आज राजभवनातून आज जाहीर करण्यात आले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Uddhav thackeray

    पुढील बातम्या