मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना व्हायरसची दहशत कायम, रेडी बंदरवर पोहोचले चिनी जहाज, तपासणी सुरू

कोरोना व्हायरसची दहशत कायम, रेडी बंदरवर पोहोचले चिनी जहाज, तपासणी सुरू

 रेडी बंदरात नॉथन ब्रॅंडन हे चीनचे जहाज दाखल झालंय. लोहखनिज वाहून नेण्यासाठी हे जहाज आलंय.

रेडी बंदरात नॉथन ब्रॅंडन हे चीनचे जहाज दाखल झालंय. लोहखनिज वाहून नेण्यासाठी हे जहाज आलंय.

रेडी बंदरात नॉथन ब्रॅंडन हे चीनचे जहाज दाखल झालंय. लोहखनिज वाहून नेण्यासाठी हे जहाज आलंय.

सिंधुदुर्ग,7 फेब्रुवारी: चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं (Corona virus)जगभरात थैमान घातलंय. भारतासह जगभरातील डझनभर देशात कोरोना पसरला आहे. आतापर्यंत 563 जणांचा या व्हायरसनं जीव घेतलाय तर 28 हजारांपेक्षा जास्त लोकांना व्हायरसची बाधा झालीय. भारतातही तीन रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रेडी बंदर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. रेडी बंदरात नॉथन ब्रॅंडन हे चीनचे जहाज दाखल झालंय. लोहखनिज वाहून नेण्यासाठी हे जहाज आलंय. जहाजावर चिनी कॅप्टनसह 22 कर्मचारी आहेत.कस्टम्स आणि बंदर विभागाचे कर्मचाऱ्यारी तपासणी करत आहे. कोरोना व्हायरस पसरण्याआधीच संबंधित जहाज चीनमधून निघाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात चार रुग्ण निरीक्षणाखाली, एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयात निरीक्षणाखाली सध्या चार प्रवासी दाखल आहेत. त्यातील तीन नागपुरात तर एक मुंबईत दाखल आहे. नागपूर येथे दाखल असलेल्या तिघांपैकी एकाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत राज्यात 22 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 14 हजार 376 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 129 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले 22 प्रवासी आजपर्यंत कोरोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही (पुणे) यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या राज्यात 4 प्रवासी भरती आहेत. यापैकी 3 जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तर एक जण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे भरती आहे. नागपूर येथे भरती असणाऱ्या 3 पैकी एका प्रवाशाचा नमुना निगेटिव्ह आला. इतर अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांकरता करण्यात येत आहे. राज्यात आलेल्या 129 प्रवाशांपैकी 54 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे डॉक्टरचाच मृत्यू

दरम्यान, ज्या डॉक्टरने जगाला सर्वात आधी कोरोना व्हायरसच्या संभाव्य धोक्याबाबत सावध केलं होतं. त्याच डॉक्टरला कोरोना व्हायरसनं आपले शिकार बनवलंय. चिनी डॉ. ली वेनलियांग यांनी स्थानिक प्रशासनाला कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला होता. पण त्यांच्या इशारा कुणी गांभीर्यानं घेतला नाही. स्थानिक पोलिसांनी तर त्यांना फटकारलं होतं. पण, वुहानमध्ये गुरुवारी डॉ. ली वेनलियांग यांचा कोरोना व्हायरसमुळे निधन झाले.

डॉ.ली यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला कोरोना व्हायरसबद्दल जगाला सावध केलं होतं. त्यांनी त्यांच्या मेडिकल स्कूलच्या ऑनलाईन एम्‍युमनी चैट ग्रुपवर हॉस्पिटलमध्ये सात पेशंट दाखल झालेत ज्यांना सार्ससारख्या रोगाची लक्षण आहेत. लीनं हेही सांगितलं की चीनमध्ये कोरोना व्हायरसची पाळमुळं ही खूप जुनी आहेत. 2003 मध्येही या व्हायरनं शेकडो लोकांचे जीव घेतले होते.

चीनमध्ये 19 परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण- विदेश मंत्रालय

चीननं गुरुवारी स्पष्ट केलं की चीमध्ये राहाणाऱ्या 19 विदेशी नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. पण त्यांनी नागरिकांच्या देशाचा उल्लेख केलेला नाही. चीनच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत 563 जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण 28,018 लोकांना व्हायरसची लागण झालीय. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात 73 लोकांचा जीव गेला आहे.

भारतानं नागरिकांना बाहेर काढलं

कोरोनाचा प्रकोप झालेल्या चीनमधील वुहान प्रांतातून भारतासह जगातील अनेक देशांनी आपल्या नागरिकांना बाहेर काढलंय. आत्तापर्यंत 647 भारतीयांना सरकारनं बाहेर काढलंय तर मालदीवच्या सात नागरिकांना हवाई मार्गानं बाहेर काढण्यात यश आलंय. 10 भारतीय तीव्र तापामुळे विमानात चढू शकले नाहीत.

First published:
top videos

    Tags: China, China news, Coronavirus