Coronavirus साताऱ्याची तरुणी वुहानमध्ये अडकली; मदतीसाठी भारतीय दुतवासाला साकडं

Coronavirus साताऱ्याची तरुणी वुहानमध्ये अडकली; मदतीसाठी भारतीय दुतवासाला साकडं

अश्विनी आता तिची वुहानमधून सुटका करण्याची विनंती केली होती. 23 जानेवारी 2020 पासून वुहान शहर पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे वुहानमधील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे.

  • Share this:

सातारा, 12 फेब्रुवारी : चीनमधील  वुहान शहरात कोरोनो व्हायरलचा प्रादुर्भाव वाढलाय. वुहानमध्ये 60 ते 70 भारतीय अडकल्याची भीती वर्तवण्यात येते आहे. या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातल्या साताऱ्याची अश्विनी पाटील ही तरुणी अडकली आहे. अश्विनी आणि तिचा पती गेल्या 8 महिन्यांपासून कामानिमित्त चीनमधील वुहान शहरात राहत होते. यादरम्यान तरुणीने व्हिसाच्या कामासाठी पासपोर्ट दिला होता. मात्र पासपोर्ट परत येण्याआधीच वुहान शहर शटडाऊन करण्यात आलं. त्यामुळे अश्विनीचा पासपोर्ट अडकला. त्याच दरम्यान अश्विनीचा पती आजारी पडला आणि मायदेशी जाऊन आपल्याला उपचार मिळावे यासाठी त्याने पोलंड सरकारला विनंती केली. पोलंड सरकारने विशेष विमान पाठवून अश्विनीच्या पतीला मायदेशी नेलं. मात्र अश्विनीकडे पासपोर्ट नसल्याने ती वुहानमध्येचं अडकली आहे.

अश्विनी आता तिची वुहानमधून सुटका करण्याची विनंती केली होती. 23 जानेवारी 2020 पासून वुहान शहर पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे वुहानमधील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे.

आपल्या मुलीला सरकार मदत करेल अशी आशा अश्विनीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. राज्यमंत्री श्रीनिवास पाटील यांनी चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अश्विनीला सुखरूप मायदेशी परतण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. आता पृथ्वीराज चव्हाण स्वत: अश्विनीच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

2 आठवड्यापूर्वीच महाराष्ट्रातील 26 विद्यार्थी भारतात परतले. त्यांना भारतात परत आणण्यासाठी राज्यमंत्री श्रीनिवास पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यामुळे आता अश्विनीला भारतात परत आणण्यासाठीही पाटील मदत करतील अशी आशा अश्विनीच्या कुटुंबीयांना आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत हजारोंचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमधील नागरिक चीनमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या देशवासीयांना चीनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

संबंधित

Fact check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का?

पंतप्रधान मोदी आम्हाला वाचवा! जपानच्या क्रुझवर अडकलेल्या भारतीयांची आर्त हाक

भारताने करून दाखवलं! ‘कोरोना’ग्रस्त पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

First published: February 11, 2020, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading