सातारा, 12 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोनाव्हायरस हा विषाणु हवेसारखा पसरत चालला आहे. आतापर्यंत हजारो लोकांना वुहानमधून हलवण्यात आले आहे. मात्र अजूनही वुहानमध्ये वुहानमध्ये 60 ते 70 भारतीय अडकल्याची भीती वर्तवण्यात येते आहे. या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातल्या साताऱ्याची अश्विनी पाटील ही तरुणी अडकली आहे. यासंदर्भात अश्विनीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात अश्विनीने मदतीसाठी भारतीय दुतवासाला साकडे घातले होते. दरम्यान, आता अश्विनीच्या मदतीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरसावले आहेत.
वाचा-Coronavirus साताऱ्याची तरुणी वुहानमध्ये अडकली; मदतीसाठी भारतीय दुतवासाला साकडं
पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीशी व्हिडीओ कॉलकरून संवादही साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली तसेच तिला आश्वासक धीर दिला आणि चीनमधील भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून तुम्हाला लवकरात लवकर मुंबईत आणण्याबद्दल जितके शक्य आहे तितके प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
अश्विनी आणि तिचा पती गेल्या 8 महिन्यांपासून कामानिमित्त चीनमधील वुहान शहरात राहत होते. काही दिवसांपूर्वी अश्विनीने व्हिसाच्या कामासाठी पासपोर्ट दिला होता. मात्र पासपोर्ट परत येण्याआधीच वुहान शहर शटडाऊन करण्यात आलं. त्यामुळे अश्विनीचा पासपोर्ट अडकला. त्याच दरम्यान अश्विनीचा पती आजारी पडला आणि मायदेशी जाऊन आपल्याला उपचार मिळावे यासाठी त्याने पोलंड सरकारला विनंती केली. पोलंड सरकारने विशेष विमान पाठवून अश्विनीच्या पतीला मायदेशी नेलं. मात्र अश्विनीकडे पासपोर्ट नसल्याने ती वुहानमध्येचं अडकली आहे.
वाचा-Fact check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का?
#Koranavirues चीनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन महिलेनं केली मदतीची याचना @CMOMaharashtra pic.twitter.com/cVccjpPEIc
— News18Lokmat (@News18lokmat) February 11, 2020
2 आठवड्यापूर्वीच महाराष्ट्रातील 26 विद्यार्थी भारतात परतले. त्यांना भारतात परत आणण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यामुळे आता अश्विनीला भारतात परत आणण्यासाठीही पाटील मदत करतील अशी आशा अश्विनीच्या कुटुंबीयांना आहे.
वाचा-भारताने करून दाखवलं! ‘कोरोना’ग्रस्त पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत हजारोंचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमधील नागरिक चीनमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या देशवासीयांना चीनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.