मुंबई, 19 ऑगस्ट : महाराष्ट्रात Coronavirus चा उद्रेक अजूनही वाढतोच आहे. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत 13,165 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत. सध्या सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा आवाका वाढला आहे.
गेल्या 24 तासांत 9011 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 4,46881 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.
राज्यात 11,62450 रुग्ण विलगीकरण मध्ये आहेत. 37094 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 6,28,642 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 21033 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,60,413 रुग्ण आहेत.
एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.35 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे.
सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असले तरी गेल्या चार पाच दिवसांत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे. उलट नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर जिल्ह्यांतली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसते आहे.
19 ऑगस्टची आकडेवारी
अॅक्टिव्ह रुग्ण - 1,60,413
24 तासांतली वाढ - 13,165
बरे झालेले रुग्ण - 4,46881
एकूण मृत्यू -21033
एकूण रुग्ण - 6,28,642
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार
पुणे 40665
ठाणे 20104
मुंबई 17914
नाशिक 10168
नागपूर 7946