वेळेच्या 1 तास आधीच शहरात दाखल झाले देवेंद्र फडणवीस, प्रशासनाची तारांबळ

वेळेच्या 1 तास आधीच शहरात दाखल झाले देवेंद्र फडणवीस, प्रशासनाची तारांबळ

देवेंद्र फडणवीस एक तास आधीच शहरात दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेसह महानगरपालिका प्रतिनिधी यांची तारांबळ उडाली.

  • Share this:

भिवंडी, 5 जुलै : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा सुरु होण्याआधी एक तास आधीच भिवंडी शहरात फडणवीस दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेसह महानगरपालिका प्रतिनिधी यांची तारांबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोव्हिड रुग्णालयास भेट देत महानगरपालिका मुख्यालयात दाखल होऊन आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडून सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

'राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागात अधिक मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य शासनाने आर्थिक दृष्टया सक्षम नसणाऱ्या महानगरपालिकांना आरोग्य सेवा उभारण्यासाठी अधिक आर्थिक निधी उपलब्ध करावा,' अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात कोरोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते .

लगबगीने झालेल्या फडणवीस यांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , माजी मंत्री रवींद्र चव्हाण , आमदार निरंजन डावखरे , प्रसाद लाड , माजी आमदार नरेंद्र पवार , भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी , प्रदेश सचिव दयानंद चोरघे उपस्थित होते .

भिवंडी महानगरपालिकेमध्ये मागील काही दिवसात परिस्थिती सुधारत असली तरी अजूनही भरपूर व्यवस्था करण्याची गरज असून , महानगरपालिका आर्थिक सुस्थितीत नसल्याने ज्या आरोग्य सुविधा उभ्या करायच्या आहेत त्याचा अधिक भार महानगरपालिकेवर येत असल्याने त्यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे. शहरात आयसीयू बेडची आवश्यकता अधिक असून व्हेंटिलेटर आवश्यक असल्याने त्यासोबत जे विलगीकरण केंद्र बनविले आहेत त्यांची संख्या फार नाही. त्यामध्ये या अलगीकरण कक्षांचे हळूहळू रूपांतर अत्यावश्यक सेवेचे बेड तयार करणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 5, 2020, 11:56 PM IST

ताज्या बातम्या