Home /News /maharashtra /

कोरोनाच्या संकटकाळात धावून आला 'हमारा बजाज', कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या संकटकाळात धावून आला 'हमारा बजाज', कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

बजाज कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 29 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे राज्यासह देशभरातील उद्योग-व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये बजाज ऑटो कंपनीचा सर्वात मोठा प्लांट आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा प्लांटही बंद आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सरकारकडून पुन्हा एकदा येथील काम सुरू करण्याची परवानगी मिळण्याची कंपनीला आशा आहे. मात्र अशातच बजाज कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 'उत्तराखंड येथील पंतनगरमधील प्लांट सुरू करण्यास सरकारकडून आम्हाला मान्यता मिळाला आहे. त्यामुळे लवकरच येथील काम सुरू होईल. आमचा सर्वात मोठा प्लांट असलेला चाकण प्लांटला परवानगी मिळणं अद्याप बाकी आहे. मात्र कुणालाही नोकरीवरून काढण्याचा बजाज कंपनीचा विचार नाही,' अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. तसंच कंपनीतील कुणाचीही वेतन कपात करण्यात येऊ नये, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, अशी माहितीही कंपनीने दिली आहे. यासंदर्भात CNBC-TV18ला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे. 'चाकण युनिटमधून इतर प्लांटमध्ये वस्तू हलवण्यास होकार मिळाला आहे. सामाजिक-आर्थिकदृष्ट्या कमकुवक असलेल्या लोकांना त्वरित मदत आवश्यक आहे. लॉकडाऊन काढल्यास जूनमध्ये 2.5 लाख युनिट्सचे उत्पादन नोंदण्याची आशा आहे. जूनमध्ये अपेक्षित असलेल्या अडीच लाख युनिट्सपैकी बहुतांश निर्यात केली जाईल,' असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. 'मे मध्ये 50% क्षमतेवर काम सुरू करण्याचा विचार करत आहोत. यावर्षी खर्चात कपात केल्यास आम्हाला 150-200 कोटी डॉलर्सची बचत होईल. या संकटातून बाहेर पडून विक्रीत वाढ करावी लागेल,' असंही 'बजाज ऑटो'चं म्हणणं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Rajeev bajaj

    पुढील बातम्या