औरंगाबाद, 19 एप्रिल : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाण्यास पोलिसांनी बंदी आणली आहे. औरंगाबादमधील विठ्ठलनगरजवळील तोरणगड सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी रुग्णालयातील नर्स आणि तिच्या मुलीचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार माय-लेकी दुपारी दिसल्या होत्या. मात्र शनिवारी रात्री नातेवाईक घरी गेले असताना नर्स आणि मुलीचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरात इंजेक्शनच्या सिरिंज सापडल्या आहेत. माय-लेकीनं आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टअंती तापसाची दिशा ठरवता येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या आणि त्यामगचं नेमकं कारण काय याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांचा तपास सुरू आहे.
हे वाचा-नवऱ्यासोबत भांडून गेली, कोरोनाची लागण झाली, अखेर...
राज्यात शनिवारी कोरोनाबाधित 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. शनिवारी दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. शनिवारी 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाने 201 बळी घेतले आहेत.
हे वाचा-औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी डिलिव्हरी, दिला गोंडस मुलीला जन्म
संपादन- क्रांती कानेटकर