Home /News /maharashtra /

एका घटनेमुळे कोल्हापुरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

एका घटनेमुळे कोल्हापुरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता गेल्या सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात 64 हजार नागरिक दाखल झाले असून जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

    कोल्हापूर, 30 मार्च : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असतानाही कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रमध्ये जिल्हा प्रवेशासाठी काही नागरिक लोकप्रतिनिधींची पत्र घेऊन येत आहेत. कोल्हापूरमध्ये आमदार-खासदार त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधींची पत्र घेऊन नागरिक प्रवेश करत आहेत, अशी पत्र सापडली तर त्या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. कोल्हापूरमध्ये प्रवेश करणारी वाहनेदेखील जप्त केली जाणार आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांना आता कोल्हापूरमध्ये प्रवेश करता येणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता गेल्या सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात 64 हजार नागरिक दाखल झाले असून जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सध्या कोल्हापूरमध्ये कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीनीही अशी पत्र देण कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तरी कोल्हापूरमध्ये इतर शहरांमधून येणाऱ्या नागरिकांचा लोंढा थांबणार का, हे पाहावं लागेल. काय आहे देशभरातील परिस्थिती? देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1024 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. आतापर्यंत 96 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत 106 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 96 जणांनी हा यशस्वी लढा दिल्यानं दिलासा व्यक्त केला जात आहे. भारतात कोरोनाची वाढणारी संख्या लक्षात घेता 14 एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन वाढणार का अशी एका भीतीही व्यक्त केली जात आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Kolhapur

    पुढील बातम्या