कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी हालचाली, नागपूरमध्ये घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी हालचाली, नागपूरमध्ये घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होताना दिसल्यानंतर व्यापरबंदी आणि रेस्टॉरंट व बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

नागपूर, 18 मार्च : कोरोना व्हायरस राज्यात वेगाने पसरू नये, यासाठी सर्वच शहरांमध्ये प्रशासनाकडून मोठं पाऊल उचललं जात आहेत. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होताना दिसल्यानंतर व्यापरबंदी आणि रेस्टॉरंट व बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता नागपूरमध्येही आज रात्री 12 वाजल्यापासून बार, वाईन शॉप, क्लब आणि पब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत ही बंदी असणार आहे.

शहरात पब आणि बारमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. कोरोनाचा प्रभाव वाढत असताना अशी गर्दी घातक ठरू शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला. याबाबत नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी माहिती दिली.

दुसरीकडे, कोल्हापूरमध्येही प्रशासन सतर्क झाले असून परदेश प्रवास करून येणाऱ्या व्यक्तींनी स्वत:ला होम क्वॉरन्टाइन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे. परदेश तसेच जिल्ह्याबाहेरुन प्रवास करून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी स्वत: आरोग्य तपासणी करून 14 दिवस घरीच स्वत:ला होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून आवश्यक उपाययोजना राबवण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या तसेच परदेश प्रवास करून काही लोक आले आहेत, येत आहेत, येणार आहेत याबरोबरच मुंबई, पुणे व राज्याच्या अन्य काही भागातून लोक स्वत:च्या मूळ गावी येत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांच्या तपासणीची सोय छत्रपपती प्रमिलाराजे रूग्णालयात केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जिल्ह्यात येणाऱ्या अशा व्यक्तींनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. ज्यांना होम कोरोन्टाईन सल्ला दिला आहे त्यांनी आपल्या घरामध्येच सुरक्षित रहावे, जेणेकरून कोरोना विषाणूचा संसर्ग इतरांना होणार नाही.

First published: March 18, 2020, 4:24 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या