कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, 12 कोटी रुपयांची अँटीव्हायरस खरेदी करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, 12 कोटी रुपयांची अँटीव्हायरस खरेदी करणार

ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामुळे आगामी काळात कोरोनाबाबत महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

जालना, 6 जून : महाराष्ट्रातील मोठ्या शहरांसोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामुळे आगामी काळात कोरोनाबाबत महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील जनतेसाठी 12 कोटी रुपयांची अँटी व्हायरस खरेदी करण्याची घोषणा केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

डब्ल्यूएचओच्या सुचनेनुसार कोव्हिड 19 च्या उपचारासाठी अतिशय महागडं असलेलं अँटिव्हायरस वायल्स अतिशय प्रभावी ठरत आहे. मात्र अतिशय महाग असल्यामुळे प्रभावी ठरत असलेल्या 12 कोटी रुपयांच्या 10 हजार अँटीव्हायरस वायल्स खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून गरजेनुसार शासनातर्फे ते गरिबांना मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना केली.

बांग्लादेशची एक कंपनी हे रँडीस्वेअर नावाचं हे अँटीव्हायरस ड्रग तयार असून ते व्हायरसला मारण्यासाठी प्रभावीपणे काम करत असल्याचंही टोपे यावेळी म्हणाले.

दरम्यान, देशभरात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या प्रतिदिन वाढीचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारांहून अधिक नोंदवला गेला. गेल्या चोवीस तासांमध्ये सुमारे 10 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरात 9851 तर, बुधवारी 9304 रुग्णांची भर पडली. 31 मेपासून 3 जूनपर्यंत करोनाच्या रुग्णांमध्ये प्रतिदिन 8 हजारांहून अधिक वाढ झाली होती.

हरियाणा, जम्मू-काश्मीर, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्लीत 1300 नव्या रुग्णांची भर पडली. 25 हजार रुग्णसंख्या असलेले महाराष्ट्र (77 हजार 793) आणि तमिळनाडूनंतर (27हजार 256) दिल्ली (25 हजार 4) हे तिसरे राज्य आहे.

First published: June 6, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या