राज्यात रात्रभरात 60 जण कोरोना पॉझिटिव्ह, अशी आहे नवी आकडेवारी

राज्यात रात्रभरात 60 जण कोरोना पॉझिटिव्ह, अशी आहे नवी आकडेवारी

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारच्या आसपास पोहोचली असताना महाराष्ट्रातील नवी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 एप्रिल : राज्यात कोरोनानं अशरक्ष: धुमाकूळ घातला आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारच्या आसपास पोहोचली असताना महाराष्ट्रातील नवी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यापैकी जवळपास एका रात्रीमध्ये 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तब्बल 12 तासांत 60 रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापैकी मुंबईत 12 तासांत 44, पुण्यात 9, अंगर, अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण तर नागपुरात नवीन 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशभरात सर्वात जास्त रुग्णांची संख्या असणारं राज्य महाराष्ट्र आहे. 5 हजारपैकी 1 हजार 78 रुग्ण तर महाराष्ट्रातील आहेत. मंगळवारी 150 नवीन कोरोनाचे केसेस समोर आल्या होत्या त्यात आता अवघ्या 12 तासांत पुन्हा 60 जणांची भर पडली आहे.

हे वाचा-कोरोनाच्या एका रुग्णानं संपूर्ण देशाला भरली धडकी, तब्बल 3 कोटी लोकं क्वारंटाइन

देशातील कोरोना व्हायरस संक्रमित लोकांनी 5 हजाराचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जवळपास 401 लोक बरे झाले आहेत, तर 149 लोकांचा झाला आहे मृत्यू झाला आहे. गेल्या 12 तासांत देशभरात 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात आहे. कोरोना व्हायरस मूळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊनसंदर्भात आगामी 11 किंवा 12 एप्रिल ला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे.

हे वाचा-धारावीत कोरोनाचा धोका वाढला, आणखी 2 जण पॉझिटिव्ह रुग्ण

संपादन- क्रांती कानेटकर.

First published: April 8, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या