Quarantine चा शिक्का असलेल्या 6 जणांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवलं

Quarantine चा शिक्का असलेल्या 6 जणांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवलं

हातावर क्वारंटाइन ( Quarantine)चा शिक्का असलेल्या सहा जणांनी सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च: हातावर क्वारंटाइन ( Quarantine)चा शिक्का असलेल्या सहा जणांनी सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवाशी सिंगपूरहून मुंबईत आले होते. नंतर ते सगळे मुंबई सेंट्रलहून सौराष्ट्र एक्स्प्रेसने बडोदा जाण्यासाठी निघाले होते. गाडी बोरीवली स्टेशनवर पोहोचताच त्यांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले. बी-1 आणि बी- 2 या बोगीमधून ते प्रवास करत होते.

मिळालेली माहिती अशी की, हातावर करोनाचा शिक्का असतानाही विलगीकरण कक्षात राहण्याऐवजी हे प्रवाशी ट्रेनने बिनधास्त प्रवास करत होते. या संशयितांना तात्काळ ट्रेनमधून उतरवण्यात आले आहे.

हेही वाचा...CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नाहीत, वेळापत्रकानुसार घेण्यात येतील

कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. न राज्य सरकारने या रुग्णांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येत आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची एअरपोर्टवरच तपासणी केली जात आहे. संशयित आढळून आल्यास अशा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे.

हेही वाचा...इंजिनिअर महिलेस अश्लील शिविगाळ, अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याविरुद्ध गुन्हा

घाबरू नका, मुख्यमंत्र्याचं आवाहन...

कोरोनाशी लढण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. राज्यात जीवनावश्याक वस्तूंच्या पुरेसा साठा आहे अनावश्यक प्रवास जनतेनी टाळावा, लोकांनी घराबाहेर पडू नये, लोकल, बसची गर्दी ओसरली. घाबरु नका, आपण जागतिक युद्ध लढत आहोत. घाबरून युद्ध जिंकलं जात नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

हेही वाचा...वाईन प्यायल्याने कोरोना बरा होतो? दाव्याबाबत आरोग्यमंत्र्यांनीच केला खुलासा

मुख्यमंत्री म्हणाले, हे व्हायरसविरुद्ध युद्ध आहे.तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका, बाहेर जाऊ नका. पण डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांचं घर सोडून तुमच्यासाठी काम करत आहेत. अनावश्यक प्रवास तरीही होत आहे. आपल्याकडे केसेस वाढत आहे. काळजी घ्यावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. बाहेरच्या देशातून जी लोक येत आहेत ते आपलेच आहेत. सगळ्यांनी सुरक्षित राहावे. दिलेल्या सूचना पाळा. हातावर quarantine स्टॅम्प मारलेले लोक इथे तिथे फिरत आहेत. आपली travel history लपवत आहेत, हे योग्य नाही.

हेही वाचा...कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं उचललं कठोर पाऊल

केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार

मी पंतप्रधान यांच्याशी बोललो आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे. तसं त्यांनी आश्वासन दिलं आहे. ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत, त्या पाळा.. सर्व धर्मियांना विनंती.. हे संकट जात-पात-धर्म पलीकडे आहे. एकजुटीने लढूया. कृपा करा, गर्दी कमी करा, अनावश्यक प्रवास टाळा..वर्क फ्रॉम होम करा.

हेही वाचा...टॅक्सी ड्रायव्हरनंतर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलेला कोरोनाचा संसर्ग

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशासह महाराष्ट्रातीस जनजीवनावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मुंबईतील दादर, माहीम आणि धारावी भागातील दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र तरी देखील नागरिकांचा समिश्र प्रतिसाद पाहून अखेर सरकारने काही अंशत: मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला मुंबईकर कसा प्रतिसाद देत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: March 19, 2020, 1:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या