Home /News /maharashtra /

महाराष्ट्रात आणखी नवे 33 जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या 781 वर

महाराष्ट्रात आणखी नवे 33 जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या 781 वर

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण असणारं पहिल्या क्रमांकावरील राज्य आहे.

  मुंबई, 06 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायसरमुळे हाहाकार पसरला आहेच पण सर्वात जास्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात आता कोरोना थांबण्याचं नाव घेत नाही आहे. देशात 4 हजारहून अधिक तर महाराष्ट्रात 781 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण असणारं पहिल्या क्रमांकावरील राज्य आहे. मुंबई कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असल्यानं येत्या काळात बीएमसीला अधिक कडक पावले उचलावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आज 33 नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गेल्या चार दिवसांत 119 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण नवीन रुग्ण-33 मुंबई-11 पुणे-19 सातारा-1 वसई-1 अनगर- 1 हे वाचा-तुमच्या घरात अंधार न व्होवो म्हणून 6 महिन्याच्या मुलीला कुशीत घेऊन काम करतेय आई! भारतात कोरोनामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस हा आकडा झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 4 हजारवर पोहोचली आहे. रविवारी देशभरातून 9 हजार 3,69 लोकांच्या रक्ताचे नमुने कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 295हून अधिक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात एकूण नवीन 33 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून रुग्णांची संख्या आता 781 वर पोहोचली आहे. हे वाचा-पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी, साताऱ्यात 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus, Uddhav thacakrey

  पुढील बातम्या