मुंबई, 29 मार्च : देशभरात कोरोननं थैमान घातलं आहे. आतापर्यंत एक हजारहून अधिक लोकांना लागण झाली आहे तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यं 85 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 14 एप्रिलपर्यंत नागरिकांनी अत्यावश्यक कामाविना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असतानाही त्याचं गांभीर्य लक्षात न घेता देशातील अनेक भागांमध्ये सऱ्हासपणे नागरिक बाहेर मजा म्हणून फिरताना पाहायला मिळत आहेत. वारंवार सांगूनही पोलिसांच्या आवाहनाला आणि सरकारच्या सूचनांचा अनादर केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये देन तरुण लॉकडाऊनदरम्यान गाडीवरून फिरायला जाण्याचा बेतात असताना पोलिसांनी पकडलं सुरुवातीला पोलिसांनी प्रेमानं आणि सध्या सोप्या भाषेत या तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता तरुणांनी पोलिसांना कशी उडवा उडवीची आणि दादागिरीची भाषा वापरली आहे. त्यानंतर पोलिसांनी दांडक्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता दोन तरुणांनी दांडका पकडून अरेरावीची भाषा केली. विनाकारण दादागिरी दाखवून हुज्जत घालणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी एकाची मानगुटी तर दुसऱ्याची कंबर धरून खेचत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
देशभरात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या आज 193 वर पोहोचली आहे. पुण्यात 1, मुंबईत, 4 सांगलीमध्ये 1 तर नागपुरात 1 असे नवीन 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढऴले होते. शनिवारी 186 वर हा आकडा पोहोचला होता. तर मुंबईमध्ये 108 रुग्णांची शनिवारी नोंद करण्यात आली होती. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या या आकड्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.