विठुरायाच्या पंढरीत कोरोनाचा धोका, एकादशीला विविध जिल्ह्यांतून 16 भक्त विनापरवाना आले

विठुरायाच्या पंढरीत कोरोनाचा धोका, एकादशीला विविध जिल्ह्यांतून 16 भक्त विनापरवाना आले

या सर्व 16 विठ्ठलभक्तांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

  • Share this:

पंढरपूर, 2 जून : एकादशीनिमित्त पंढरपूर येथे परजिल्ह्यातील विनापरवाना तब्बल 16 लोक फिरताना आढळून आले आहेत. या सर्व 16 विठ्ठलभक्तांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

मंगळवार हा एकादशीचा दिवस आहे. त्यामुळे दर महिन्याची एकादशीला वारी करणारे अनेक विठ्ठल भक्त महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यात फारसे वारकरी तथा विठूभक्त पंढरीत आले नाहीत. मात्र लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्यावर आज तब्बल 16 विनापरवाना विठ्ठलभक्त पंढरीत वावरताना दिसून आले.

या सर्व विठ्ठल भक्तांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांची सध्या वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून होत आहे. पंढरपुरात सापडलेल्या 16 विठ्ठलभक्त हे नांदेड , सातारा , सांगली , लातूर , उस्मानाबाद , सोलापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हेही वाचा - पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा 55 वर्षीय व्यक्तीचा आरोप, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरला कोरोना प्रादुर्भावाचा धोका आहे. असं असताना विविध जिल्ह्यातील लोक तालुक्यात दाखल होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसंच पुढील काही दिवस विठुरायाच्या भक्तांनीही काळजी घ्यावी, असे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

First published: June 2, 2020, 10:17 PM IST

ताज्या बातम्या