106 वर्षांच्या आजीपुढे हरला कोरोना, डिस्‍चार्ज मिळताच चेहऱ्यावर फुललं असं हसू

106 वर्षांच्या आजीपुढे हरला कोरोना, डिस्‍चार्ज मिळताच चेहऱ्यावर फुललं असं हसू

आनंदीबाई यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांचं वय लक्षात घेता अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली होती. पण....

  • Share this:

डोंबिवली, 20 सप्टेंबर: देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विस्फोट झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनानं हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे. यात एका वयोवृद्ध आजीनं कोरोनाचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे या आजीचं वय 106 वर्षे आहे. आनंदीबाई पाटील असं या आजीचं नाव असून त्या डोंबिवलीत राहतात.

हेही वाचा...भयंकर! दारुड्या बापानंच आपल्या पोट्याच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीयाला विकलं

आनंदीबाई पाटील यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Covid 19) लागण झाली होती. मात्र, तरी देखील आनंदीबाई या डगमगल्या नाही. त्यांनी एखाद्या योध्दाप्रमाणे कोरोनाशी जोरदार लढा दिला. आता आनंदीबाई यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, आनंदीबाई यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांचं वय लक्षात घेता अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली होती. परंतु डोंबिवली येथील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना तिथे दाखल करून घेतले. उपचाराअंती आता आनंदीबाई पाटील या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांचेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्वीट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांची प्रशंसा केली आहे.

हेही वाचा...द्रोह करणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा...

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना 106 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळणे, ही खरोखर सकारात्मक आणि समाधानकारक बाब आहे.

24 तासांत 94 हजार जणांना मिळाला डिस्चार्ज!

नवे रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. रुग्ण संख्या कमी कशी करावी याची सरकारला आता चिंता आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच काही दिलासादायक आकडेवारीही समोर आली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 94,612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची देशातली संख्या ही 43 लाख झाली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 79.68 टक्के एवढा झाला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 20, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या