नाशिक, 29 नोव्हेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron Variant) जगभरात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेवरून (south africa) मुंबईत एक हजाराहून जास्त प्रवाशी आले आहे. तर नाशिकमध्येही (nashik) दोन जण दक्षिण आफ्रिकेतून आल्याचे समोर आले आहे. या दोघांची चाचणी घेण्यात आली आहे.
आयर्न मॅन स्पर्धेसाठी नाशिक शहरातील दोन स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवी व्हेरिएंट आढळून आल्यामुळे जे जे प्रवाशी आले आहे, त्यांची चाचणी घेतली जात आहे. या दोन्ही स्पर्धकांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली आहे. तसंच त्यांच्या कुटुंबीयांचे स्वॅब घेण्यात आले असून आज उशिरापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यांच्या अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जाणार आहे.
धक्कादायक! मोबाईल पाहून पाहून आता घरच्यांनाही ओळखेना; तरुणाची भयंकर अवस्था
दरम्यान, याशिवाय शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय देखील १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत तयारी केली आहे. पण कोरोनाचे नवी संकट समोर येऊन ठेपल्यामुळे आता नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
शेअर बाजारातील घसरणीत 'या' स्टॉक्समध्ये गुंतवणुकीची Motilal Oswal ची शिफारस
महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलला आहे. तशी सूचना नाशिक महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
तसंच, परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन पुढे येऊन प्रशासनाला माहिती देण्याच आवाहन सुद्धा पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik