राज्यात कोरोनाचा कहर; मात्र अवघ्या 20 दिवसात 'हे' गाव झालं कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाचा कहर; मात्र अवघ्या 20 दिवसात 'हे' गाव झालं कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान या गावातून सकारात्मक वृत्त समोर आलं आहे.

  • Share this:

नांदेड, 22 एप्रिल : 20 दिवसापूर्वी गावात 55 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यावेळी गावकऱ्यांवर मोठा ताण आला होता. मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने प्रशासनाने गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केलं. पण प्रशासनाच्या या निर्णयाकडे सकारात्मक पाहत गावकऱ्यांनी स्वत:वर निर्बंध घातले. त्याचा परिणाम असा असा झाला की 20 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नाही आणि बाधितरुग्णही बरे झाले.

कोविड नियमांचे कडक पालन करून नांदेड जिल्हातील एका गावाने कोरोनाला हरवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील अमराबादबाद तांडा या गावात 20 दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पहिल्या दिवशी 3 नंतर पाच आणि तिसऱ्या दिवशी पस्तीस रुग्ण आढळले. पाच ते सहा दिवसात तब्बल 55 रुग्ण आढळल्याने प्रशासनाने गाव सील करून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं. प्रशासनाच्या या निर्णयानंतर गावकऱ्यांनी देखील कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला आणि सुरू झाली नियमांची कडक अंमलबजावणी.

हे ही वाचा-कर्नाटकात कोरोनाची भयावह परिस्थिती; अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग

गावात सगळ्यांना मास्क घालणं बंधनकारक केलं. अन्यथा 200 रुपये दंड आकारण्यात येऊ लागला. गावात कोणताच समारंभाचं आयोजन करण्यात आलं नाही. बाहेरुन गावात कोणालाही प्रवेश नाही, प्रवेश केला तर 500 रुपये दंड, त्याशिवाय अंगणवाडी सेविकांमार्फत गावकऱ्यांची रोज प्राणवायू आणि तापमान तपासणी केली जात होती. रोज गावात सॅनिटायजरची फवारणी असे नियम या गावात लावण्यात आले. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी युवकांची एक समिती नेमण्यात आली. याशिवाय रोज सकाळ-संध्याकाळी लाऊडस्पीकरवरून नियम पाळण्याचे आवाहन केले जाते. गावात सध्या शेजारच्या घरी जाण्याची देखील परवानगीदेखील देण्यात आलेली नाही. .

याबाबत एका गावकऱ्याने सांगितलं की, काटेकोरपणे नियमांचे पालन केल्याने गेल्या 20 दिवसात या गावात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जे बाधित 55 जणं होते. त्यापैंकी काहींनी कोविड केयर सेंटर तर काहींनी घरी उपचार घेतले. 55 पैकी 51 जण बरे झाले. उर्वरित चार जणांची प्रकृती देखील ठणठणीत आहे. ते चार जण येत्या दोन तीन दिवसात बरे होतील.

यावर सरपंच अश्विन पवार म्हणाल्या की, कडक लॉकडाऊन आणि निर्बंध लावूनही अनेक ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. पण नियम लावण्यापेक्षा नागरिकांनी स्वत:च नियमांचे पालन केले तर कोरोनाला हरवण सहज शक्य आहे आणि हेच या अमराबाद तांडा येथील गावकऱ्यांनी करून दाखवल.

Published by: Meenal Gangurde
First published: April 22, 2021, 6:46 PM IST

ताज्या बातम्या